Pune Nashik Expressway : पुणे-नासिक महामार्ग हा एक व्यस्त महामार्गापैकी एक आहे. या मार्गावरून रोजाना लाखों प्रवासी प्रवास करतात. हा मार्ग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून जातो. या मार्गावर अनेक ठिकाणी मात्र प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका बसतो. विशेषता भोसरी, कासारवाडी आणि मोशी या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
अशा परिस्थितीत या महामार्गावर आठ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून विकसित केला जाणार आहे. दरम्यान, या एलिवेटेड कॉरिडोर संदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. ती म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कॉरिडॉरसाठी नुकतेच सादरीकरण केले आहे.
आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, या प्रकल्प अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थातच एनएचएआयच्या माध्यमातून महामार्गावरील नाशिक फाटा ते मोशीपर्यंत प्रशस्त आठ पदरी म्हणजे आठ लेनचा रस्ता विकसित केला जाणार आहे. यात दोन्ही बाजूंना 2 लेन सर्व्हिस रोडसह विद्यमान रस्त्याचे 4/6 लेनमध्ये सुधारणा केली जाणार आहे आणि सिंगल पिलरवर टायर -1 येथे ‘8 लेन‘ एलिव्हेटेड फ्लायओव्हर’चे बांधकाम प्रस्तावित करण्यात आले आहे.
हे काम केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली NHAI कडून पूर्ण केल जाणार असून या प्रकल्पाला आता गती देण्यात आली आहे. यानुसार पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून जाणाऱ्या या रस्त्यावरील नाशिक फाटा ते खेड दरम्यानच्या 29.81 किमी अंतरावरील ‘एलिव्हेटेड कॉरडॉर’चे सादरीकरण करण्यात आले आहे.
म्हणजे या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या या सादरीकरणात 8 पदरी रस्ता, मेट्रो लाईन (डबल डेकर), सव्र्व्हीस रोड, रॅम्प या बाबीचा समावेश होता.
खरंतर सध्या मोशी येथे या महामार्गावरून 90 हजाराहून अधिक वाहनांची वर्दळ आहे, मात्र या नवीन कॉरिडॉरमुळे जवळपास रोजाना सहा लाखाहून अधिक वाहनांची सुलभपणे वाहतूक करता येणे शक्य होणार आहे. याव्यतिरिक्त खेडमध्ये या महामार्गावरून रोजाना जवळपास 67 हजारापेक्षा अधिक वाहनांची सध्या स्थितीला वाहतूक सुरू आहे.
मात्र हा कॉरिडॉर तयार झाल्यानंतर या मार्गावर जवळपास चार लाखापर्यंतच्या वाहनांची सुलभपणे वाहतूक करता येणार असल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम पूर्ण झाल्यानंतर या महामार्गावरील वाहतूक जलद गतीने होणार आहे.
यामुळे पुण्यावरून येणाऱ्या गाड्या विना अडथळा चाकणच्या दिशेने जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. नाशिक फाट्यापासून मोशीपर्यंत जाणाऱ्या स्थानिक प्रवाशांसाठी काही ठिकाणी ‘रोड रॅम्प डाऊन’ करून जाण्याची सुविधा विकसित होणार आहे. निश्चितच यामुळे वाहतुकीला चालना मिळणार आहे.
मोशीपासून नाशिक फाट्यापर्यंत येणाऱ्यासाठी देखील अशाच सुविधा तयार केल्या जाणार आहेत. तसेच, पुणे विमानतळावरून चाकणकडे जाण्यासाठीही मार्गिका राहणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली आहे. निश्चितच हा कॉरिडॉर प्रवाशांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. दरम्यान या कॉरिडोरसाठी आता हालचाली तेज झाल्या असल्याने प्रवाशांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.