Pune – Nashik Elevated Corridor Project : नमस्कार मित्रांनो, पुणे नाशिक महामार्गाला आता मोठी गती मिळणार आहे. नाशिक फाटा ते मोशी पर्यंत शासनामार्फत आठ लेन एलिवेटेड कॉरिडॉर उभारणी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. नाशिक महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे, या एलिवेटेड कॉरिडॉर चे निर्माण पुढील पन्नास वर्षाच्या अनुषंगाने केले जाणार आहे. त्याच संबंधी आपण सविस्तर माहिती येथे पाहूया.

पुणे – नाशिक महामार्ग Elevated Corridor Project information in Marathi 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. प्रकल्प अंतर्गत आठ पदरी प्रशस्त महामार्ग निर्मिती केली जाणार आहे. आगामी 50 वर्षांच्या वाहतुकीचा विचार करून, हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा असे आवाहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे.

प्रकल्पाचे काम सुरू असताना, मेट्रो आणि अंतर्गत रस्त्यांवर ताण येणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी देखील ‘एलिवेटेड कॉरिडॉर’ संबंधी सूचना जारी केल्या आहेत.

पिंपरी चिंचवड परिसरातून जाणारा पुणे – नाशिक महामार्गावर भोसरी, कासरवाडी आणि मोशी भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडीमुळे एलिवेटेड कॉरिडॉर ची उभारणी करण्यात येणार आहे. एलिवेटेड कॉरिडोर ची उभारणी कशाप्रकारे केली जाणार यासंबंधी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग विभागाद्वारे प्रकल्पाचे सादरीकरण (Presentation) करण्यात आले आहे.

Pune – Nashik Elevated Corridor Project

विद्यमान महामार्गावर नाशिक फाटा ते मोशी पर्यंत वाहतूक अनुकूल असा प्रशस्त आठ पदरी रस्ता होणार आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूंना 2 लेन सर्व्हिस रोडसह महामार्ग रस्त्याच्या 4/6 लेनमध्ये सुधारणा करणे, आणि सिंगल पिलरवर टायर -1 येथे ‘8 लेन‘ एलिव्हेटेड फ्लायओव्हर’चे बांधकाम प्रस्तावित करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड परिसरातून जाणारा हा महामार्ग नाशिक फाटा ते खेड दरम्यान 29.8 किलोमीटर अंतराचा असणार आहे. एलिवेटेड कॉरिडोरचे सादरीकरण करताना, यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. या एलिवेटेड कॉरिडॉर मध्ये 8 पदरी रस्ता, मेट्रो लाईन (डबल डेकर), सव्र्व्हीस रोड, रॅम्प बाचा या सर्वांचा समावेश आहे.

सद्यस्थितीला मोशी मध्ये प्रति दिवस 96 हजार अधिक वाहनांची वर्दळ आहे, तर खेडमध्ये तीच संख्या 67 हजार हून अधिक आहे. भविष्यातील वाढत्या रहदारींचा विचार करता वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवू शकतो, यावर उपाय म्हणून हे एलिवेटेड कॉरिडोर निर्माण केले जाणार आहे. प्रकल्प निर्मिती झाल्यानंतर मोशीतून तब्बल 6 लाख 70 हजार हून अधिक वाहनांची रहदारी सुलभ होणार आहे.

सोबतच खेडमध्ये नवीन एलिवेटेड कॉरिडोर ची निर्मिती झाल्यानंतर, प्रतिदिन 3 लाख 97 हजार हून अधिक वाहनांची रहदारी सुलभ होणार आहे. आठ पदरी एलिवेटेड कॉरिडोर असल्यामुळे त्याची क्षमता ही पुढील 50 वर्षातील शहरातील रहदारी सुलभ राखण्यासाठी सक्षम असणार आहे. असा दावा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण दरम्यान केला आहे.

पुणे नाशिक महामार्गाच्या एलिव्हेटेड कॉलरचे काम पूर्ण झाल्यानंतर, चाकणला जाण्यासाठीचा मार्ग हा विना अडथळा मोकळा होणार आहे. सोबत नाशिक फाट्यापासून स्थानिक प्रवाशांसाठी काही ठिकाणी रोड स्टॅम्प डाऊन याची सुविधा देखील या अंतर्गत देण्यात येणार आहे.

Vision – 2022 अंतर्गत पुणे नाशिक महामार्गाच्या विकासाचा संकल्प हा सरकारने घेतला होता. राज्यातील राजकीय घडामोडी, कोविड महामारी, लॉकडाऊन या सर्व अडचणीमुळे या प्रकल्पाचे काम संथ रितीने चालू होते. परंतु आता परिस्थिती स्थिर झाली आहे, त्यामुळे पुणे नाशिक महामार्ग एलिवेटेड कॉरिडॉर प्रकल्पाचे काम पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *