Pune-Nagpur Railway : सध्या उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध रेल्वे मार्गांवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. पुणे ते नागपूर दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये देखील मोठी गर्दी होत आहे. हेच कारण आहे की, उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पुणे ते नागपूर उन्हाळी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय मध्ये रेल्वेने घेतलेला आहे.
10 एप्रिलला मध्य रेल्वेने याबाबतचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ही गाडी आठवड्यातून दोन दिवस चालवली जाणार होती. पण, आता मध्य रेल्वेने या निर्णयात बदल केला असून ही गाडी आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे.
म्हणजेच अवघ्या काही तासातच मध्य रेल्वेने आपला आधीचा निर्णय बदलला आहे. दरम्यान या बदललेल्या निर्णयामुळे पुणे ते नागपूर आणि नागपूर ते पुणे असा प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आठवड्यातून तीन दिवस या मार्गावर उन्हाळी विशेष गाडी धावणार आहे.
यामुळे अतिरिक्त गर्दी नियंत्रणात राहिल आणि प्रवाशांना जलद प्रवास करता येईल अशी आशा व्यक्त होत आहे. दरम्यान, आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक ?
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर पुणे उन्हाळी विशेष गाडी 18 एप्रिल ते 13 जून या कालावधीत चालवली जाणार आहे. तसेच पुणे ते नागपूर उन्हाळी विशेष गाडी 19 एप्रिल ते 14 जून या कालावधीत चालवली जाणार आहे.
ही गाडी आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. यासाठी उद्यापासून आरक्षण सुरू होणार आहे. रेल्वेने सांगितल्याप्रमाणे 13 एप्रिल पासून या गाड्यांसाठी आरक्षण सुरू केले जाणार आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार ?
मध्ये रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या विशेष गाडीला नागपूर-पुणे-नागपूर मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. ही गाडी वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड चोरडलाईन आणि उरळी या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
एकंदरीत ही गाडी राज्यातील 13 महत्त्वाच्या स्थानकावर थांबणार असल्याने या संबंधित रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात आहे.