Pune Mumbai Railway : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई ते राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे यादरम्यान दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. या दोन्ही शहरादरम्यान दैनंदिन कामानिमित्त ये-जा करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे.
या दोन्ही शहरा दरम्यान प्रवास करणारे प्रवासी प्रामुख्याने रस्ते आणि रेल्वे मार्गाने प्रवास करत असतात. पण, मुंबई ते पुणे दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबईवरील क्रमांक १० आणि ११ या दोन फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम केले जाणार आहे. या कामानिमित्ताने रेल्वे प्रशासनाने ‘सीएसएमटी’ स्थानकावर येणाऱ्या काही गाड्या रद्द केल्या आहेत.
पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या काही गाड्या रद्द केल्या जाणार आहेत. यामध्ये पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेस ट्रेनचा देखील समावेश आहे. तसेच काही एक्सप्रेस गाड्या या दादरपर्यंतचं चालवल्या जाणार आहेत.
म्हणजे काही गाड्या आंशिक स्वरूपात रद्द करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत आता आपण मुंबई ते पुणे दरम्यान धावणाऱ्या कोणत्या गाड्या रद्द झाल्या आहेत आणि कोणत्या गाड्या दादरपर्यंत धावणार आहेत याविषयी सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या गाड्या रद्द राहणार
रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 28 मे ते दोन जून 2024 या कालावधीत पुणे – मुंबई – पुणे प्रगती एक्स्प्रेस रद्द राहणार आहे. 31 मे ते दोन जून 2024 या कालावधीत पुणे-मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस रद्द राहणार आहे.
एक जून आणि दोन जूनला पुणे- मुंबई -पुणे डेक्कन एक्स्प्रेस रद्द राहणार आहे. तसेच कुर्ला – मडगांव – कुर्ला ही एक्सप्रेस ट्रेन एक आणि दोन जूनला रद्द करण्यात आली आहे.
कोणत्या गाड्या दादर पर्यंत धावणार?
रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार उद्या 17 मे 2024 पासून ते 27 मे 2024 या कालावधीपर्यंत साई नगर शिर्डी – मुंबई -साई नगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस, भुवनेश्वर – मुंबई – भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस, हैदराबाद – मुंबई – हैदराबाद हुसेन सागर एक्स्प्रेस, होस्पेट – मुंबई – होस्पेट एक्स्प्रेस, मुंबई -चेन्नई – मुंबई चेन्नई एक्स्प्रेस या एक्सप्रेस गाड्या दादर पर्यंत धावणार आहेत आणि दादर रेल्वे स्थानकावरूनच सुटणार आहेत.