Pune Mumbai Expressway : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई ते राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे यादरम्यान दररोज हजारो नागरिक ये-जा करत असतात. उद्योग, शिक्षण, पर्यटन इत्यादीसाठी या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवाशांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे.
दरम्यान पुणे-मुंबई एक्सप्रेस वे ने प्रवास करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, आता या एक्सप्रेस वे ने प्रवास करण्यासाठी वेग-मर्यादेचे बंधन पाळावे लागणार आहे.
जे प्रवासी वेग मर्यादेचे बंधन पाळणार नाहीत त्याच्यावर आता कठोर कारवाई होणार आहे. खरे तर या मार्गावर दररोज हजारो वाहने धावतात. पण ही वाहने प्रवास करताना वेदमर्यादा पाळत नाहीत, यामुळे अपघात होण्याची शक्यता असते.
आता मात्र या एक्सप्रेस वे ने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना वेग मर्यादेचे पालन करावे लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात काल अर्थातच 19 एप्रिल 2024 ला अपर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य सुखविंदर सिंह एक महत्त्वाची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून 94 किलोमीटर अंतराच्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर सर्वत्र गॅन्टी उभारत त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे.
त्यामुळे आता हा संपूर्ण मार्ग हा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सर्विलियन्समध्ये आला आहे. परिणामी आता वेगमर्यादेचे बंधन पाळावे लागणार आहे नाहीतर वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई होणार असे बोलले जात आहे.
किती आहे वेगमर्यादा
हाती आलेल्या माहितीनुसार, या मार्गावरील घाट सेक्शन मध्ये वेग मर्यादा भिन्न राहणार आहे आणि समतल मार्गावर वेग-मर्यादा भिन्न राहणार आहे. तसेच प्रत्येक वाहनासाठी वेगवेगळी मर्यादा राहणार आहे.
वाहन चालकासह आठ जण ज्या गाडीमधून प्रवास करतात अशी प्रवासी गाडी या एक्सप्रेस वे वर समतल भागात शंभर किलोमीटर प्रति तास आणि घाट सेक्शन मध्ये किलोमीटर प्रति तास या वेगाने चालवता येणार आहे.
ज्या प्रवासी गाडीमध्ये वाहन चालकासह नऊ लोक किंवा त्यापेक्षा अधिकजण प्रवास करत असतील अशी गाडी या एक्सप्रेस वे वर समतल भागात 80 किलोमीटर प्रति तास आणि घाट सेक्शन मध्ये 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने चालवता येणार आहे.
मालवाहतूक गाडीला देखील समतल भागात ताशी 80 km ने प्रवास करता येणार आहे आणि घाट सेक्शन मध्ये ताशी 40 किलोमीटर वेगाने प्रवास करता येणार आहे.