Pune Mumbai Expressway : पुणे-मुंबई एक्सप्रेस वे ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. खरे तर पुण्याहून मुंबईला आणि मुंबईहून पुण्याला जाणारे प्रवासी या महामार्गाने मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात.
दररोज या मार्गांवर हजारो वाहने सुसाट धावत असतात. मात्र या एक्सप्रेस वे वर नेहमीच वाहतूक कोंडी पाहायला मिळते. वाहतूक कोंडीमुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसतो. प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाया जातो.
मात्र आता या मार्गावरील प्रवास जलद होणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे.
खरे तर वाहनांना फास्टॅग लावण्यात आले आहे, मात्र असे असतानाही या मार्गांवरील तळेगाव आणि खालापूर येथील टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. परिणामी टोलनाक्याजवळ नेहमीच मोठी वाहतूक कोंडी होत असते.
यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी आता राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तळेगाव आणि खालापूर टोलनाक्यांवरील काउंटरची म्हणजे Toll Plaza ची संख्या वाढवली जाणार आहे.
येथील टोलनाक्यांवरील काउंटरची संख्या अनुक्रमे 28 आणि 34 पर्यंत वाढवली जाणार आहे. यामुळे टोल नाक्यांवरील गर्दी कमी होईल आणि प्रवाशांचा प्रवास सुसाट होईल अशी आशा आहे.
विशेष म्हणजे ही सुविधा मार्च 2024 पासून सुरू होणार अशी माहिती एमएसआरडीसीने दिली आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने टोलनाक्यावर फास्टॅग करण्यासाठी प्रवाशांना जास्त वेळ थांबावे लागू नये; तसेच त्यासाठी रांगा लागता कामा नयेत, यासाठी खबरदारीचे पाऊल उचलले आहे.
खरंतर सध्या स्थितीला या मार्गांवरील तळेगाव टोलनाक्यावर प्रत्येकी आठ-आठ अशी सोळा काउंटर्स म्हणजेच टोलप्लाझा आहेत.
पण, आता दोन्ही दिशेने १४-१४ अशी २८ टोल प्लाझा विकसित होणार आहेत. तसेच खालापूर नाक्यावरही सध्या स्थितीला दोन्ही दिशेने आठ-आठ टोल प्लाजा आहेत.
त्या ठिकाणीही आता प्रत्येकी १७-१७ अशी ३४ पर्यंत टोल प्लाझाची क्षमता वाढवली जाणार आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होणार आहे.