Pune Mhada News : देशात येत्या काही दिवसांमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. लोकसभेच्या निवडणुका झाल्यात की लगेचच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. दरम्यान, या साऱ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या निवडणुकीचे पडघम वाजत आहेत.
राजकीय पक्षांनी आता आगामी निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. अशातच मात्र पुणेकरांसाठी एक मोठी कामाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभेची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच पुणे म्हाडा मंडळाकडून 1700 घरांसाठी नवीन लॉटरी जाहीर केली जाणार आहे.
विशेष म्हणजे याची अर्ज प्रक्रिया लोकसभा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सुरु होणार आहे. म्हणजे आचारसंहितेच्या कालावधीमध्ये इच्छुक अर्जदारांकडून या घरांसाठी अर्ज मागवले जाणार आहे.
तसेच आचारसंहिता पार पडली की मग या घरांसाठी लॉटरी काढण्याचा निर्णय पुणे मंडळाने घेतलेला आहे. अर्थातच आचारसंहितेचा संपूर्ण सदुपयोग करण्याचे मंडळाने ठरवले आहे.
यामुळे लवकरच सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरांची उपलब्धता होणार आहे. सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न यामुळे पूर्ण होईल अशी आशा आहे.
अर्जाला केव्हा सुरवात होणार ?
खरंतर गेल्या काही वर्षांमध्ये पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे आता सर्वसामान्यांना घर खरेदीसाठी मोठी मेहनत घ्यावी लागत आहे.
तसेच अनेकजण म्हाडाच्या घरांची देखील आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान पुणे मंडळाकडून अशाच इच्छुक नागरिकांसाठी आता 1700 घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे. यामध्ये 20% योजनेच्या घरांचा समावेश राहणार आहे.
या लॉटरीसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार अशी माहिती प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून समोर आली आहे.
म्हणजेच लोकसभेची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच या घरांसाठीची अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. तसेच या घरांची प्रत्यक्षात लॉटरी लोकसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर निघणार अशी आशा आहे.