Pune Metro News : गेल्या वर्षी पुणे शहराला दोन मेट्रो मार्गांची भेट मिळाली. पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या दोन मार्गावर मेट्रो सुरु झाली. या मार्गावरील मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.
तेव्हापासून या दोन्ही मेट्रो मार्गांना पुणेकरांच्या माध्यमातून अभूतपूर्व असा प्रतिसाद दाखवला जात आहे. मात्र या मार्गांचा दुसरा टप्पा केव्हा सुरू होणारा हा सवाल देखील पुणेकरांच्या माध्यमातून सातत्याने उपस्थित केला जात आहे.
सिविल कोर्ट ते स्वारगेट आणि रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हे विस्तारित मार्ग केव्हा सुरू होणार हा पुणेकरांचा सवाल आहे.
दरम्यान याबाबत महा मेट्रोच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. खरे तर रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मार्गावर 2023 अखेरपर्यंत प्रवासी सेवा सुरू होणे अपेक्षित होते.
यासाठी महा मेट्रोच्या माध्यमातून प्रयत्न देखील केले जात होते. मात्र गेल्यावर्षी या मार्गावर प्रवासी सेवा सुरू होऊ शकली नाही.
या मार्गाचे काम नियोजित वेळेत पूर्ण झाले नसल्याने या मार्गावर प्रवासी सेवा सुरू झाली नाही. आता मात्र या मार्गाचे काम पूर्ण झाले असून लवकरच या मार्गावर आता मेट्रो धावणार असा आशावाद व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या मार्गाच्या पाहणीसाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे एक पथक या आठवड्यात पुण्यात दाखल होणार आहे. हे पथक एक आठवडाभर या मार्गाची पाहणी करणार आहे.
यानंतर मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त स्वतः या मार्गाची पाहणी करणार आहेत.मग रेल्वे सुरक्षा आयुक्त या मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्यास परवानगी देतील.
यानंतर महा मेट्रोच्या माध्यमातून राज्य सरकारला हा मेट्रो मार्ग सुरू करण्यासाठी सज्ज आहे असे सांगितले जाईल. यानंतर मग राज्य शासनाच्या माध्यमातून हा मार्ग केव्हा सुरू करायचा याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल.
महा मेट्रोच्या कार्यकारी संचालकांनी ही माहिती दिली आहे. एकंदरीत या मार्गाचे काम आता पूर्ण झाले असून फेब्रुवारी 2024 मध्ये हा मार्ग प्रवाशांसाठी सुरू होण्याची दाट शक्यता आहे.