Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे. एकीकडे मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण होत असतानाचं आता सध्याच्या आणि प्रस्तावित अशा दोन्ही मार्गांच्या विस्ताराची गरज वाढत असल्याचे पाहायला मिळतं आहे.
सध्या पुण्यात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट पैकी पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी पैकी वनाज ते रुबी हौल क्लीनिक हे दोन 24 किलोमीटर लांबीचे मार्ग सुरु आहेत.
विशेष बाब म्हणजे सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट आणि रुबी हौल क्लीनिक ते रामवाडी या 9 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. म्हणजे पुण्यात पहिल्या टप्प्यात एकूण 33 किलोमीटर लांबीचा मार्ग सुरू होणार आहे.
या 33 किलोमीटरपैकी बाकी राहिलेल्या 9 किलोमीटरचे काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण होणार असा दावा केला जात आहे. अशातच आता पुणे मेट्रोबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने सिंहगड रोडवरील खराडी ते कोल्हेवाडी ते खडकवासला असा प्रस्तावित मेट्रो मार्ग तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा नियोजित मेट्रो मार्ग 25.65 किमी लांबीचा राहणार आहे. विशेष म्हणजे हा मार्ग दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या खडकवासला धरणापर्यंत विस्तारित केला जाणार आहे. सरकार हा मार्ग वाढवण्यासाठी इच्छुक आहे.
यामुळे शासनाच्या आदेशानंतर इच्छुक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. दरम्यान हा मार्ग विस्तारित करायचा की नाही याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. बुधवारी विधानसभेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनीच याबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.
उदय सामंत यांनी सांगितल्याप्रमाणे, खराडी ते कोल्हेवाडी या खडकवासल्यातील मूळ मेट्रो मार्गाचा सर्वंकष प्रकल्प अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ हा अहवाल मंजूर करून सरकारला पाठवणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारला पुरवणी प्रस्ताव सादर करण्यापूर्वी खडकवासला धरणापर्यंतच्या विस्तारित मार्गाचा स्वतंत्र सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा, असे पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
खडकवासला धरणापर्यंत मार्ग वाढवण्याची व्यवहार्यता तपासण्यासाठी पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच घटनास्थळी भेट दिली.
विशेष म्हणजे धरणापर्यंतच्या मेट्रो मार्ग विस्तारास अधिकाऱ्यांकडून तत्वत: मंजुरी सुद्धा मिळाली असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता या प्रस्तावित विस्तारित मेट्रो मार्गाला मंजुरी मिळते की नाही हे पाहण्यासारखे राहणार आहे.