Pune Metro News : गेल्या वर्षी पुणेकरांना एक मोठी भेट मिळाली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दोन मेट्रो मार्ग सुरू झाले आहेत. ऑगस्ट 2023 मध्ये पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक यादरम्यानचा मेट्रो मार्ग सुरू झाला आहे.

विशेष म्हणजे या मार्गांना शहरातील नागरिकांनी विशेष प्रतिसाद देखील दाखवला आहे. या मेट्रो मार्गांवर रोजाना 60 ते 65,000 प्रवासी प्रवास करत असल्याचे सांगितले जात आहे.

म्हणजेच पुणेकरांनी शहरातील मेट्रोला अभूतपूर्व असा प्रतिसाद दाखवला आहे. यामुळे, या मेट्रो मार्गांचा विस्तार देखील लवकरात लवकर व्हावा यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सिविल कोर्ट ते स्वारगेट आणि रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मार्गावर या चालू वर्षातच मेट्रोची सेवा सुरू होणार आहे.

परिणामी शहरातील नागरिकांचा प्रवास आणखी जलद आणि सुरक्षित होणार आहे. अशातच, मात्र पुणे मेट्रो प्रशासनाने मेट्रो संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.

खरे तर प्रशासनाने मेट्रोने प्रवास करण्यासाठी वेगवेगळे नियम तयार केले आहेत. अशातच आता या नियमात आणखी एका नियमाची भर पडली आहे.

या नियमानुसार आता पुणे मेट्रोने प्रवास करताना काही वस्तू प्रवाशांना सोबत नेता येणार नाहीत. यामध्ये पाळीव प्राण्यांचा आणि पक्षांचा देखील समावेश आहे.

मेट्रो प्रशासनाने सोशल मीडियामध्ये दिलेल्या माहितीनुसार, पाळीव प्राणी, पक्षी, बंदूक, चाकू, टोकदार वस्तू, मद्य, सिगारेट, ई-सिगारेट, आगडबी, लाईटर, पेट्रोल, डीझेल असे ज्वलनशील पदार्थ, तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, रासायनिक पदार्थ, गॅस सिलेंडर आदि वस्तू पुणे मेट्रो ने प्रवास करताना प्रवाशांना सोबत बाळगता येणार नाहीत.

मात्र प्रवाशांना प्रवासादरम्यान सायकल सोबत घेऊन जाता येणार आहे. पण मेट्रो प्लॅटफॉर्मवर सायकल चालवता येणार नाही याची देखील दक्षता प्रवाशांनी घ्यायची आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *