Pune Metro News : पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. सध्या स्थितीला पुण्यात पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या मार्गांवर मेट्रो धावत आहे.

विशेष म्हणजे या मेट्रो मार्गांचा विस्तार लवकरच होणार आहे. सिविल कोर्ट ते स्वारगेट आणि रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मार्गांवर लवकरच मेट्रो धावण्याची शक्यता आहे.

यापैकी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मार्गाचे काम पूर्ण झाले असून रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी पाहणी देखील पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे या मार्गावर रेल्वे चालवण्यास त्यांनी मान्यता देखील दिली आहे.

यामुळे आता राज्य शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच या मार्गावर मेट्रो सुरू होणार अशी आशा व्यक्त होत आहे. अशातच मात्र मेट्रो प्रशासनाने तिकीटा बाबत मोठा निर्णय घेतला आहे.

खरंतर सध्या स्थितीला पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या मार्गांवर सुरू असलेल्या मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ५० ते ५५ हजारांच्या घरात पोहोचली आहे.

दरम्यान या हजारो मेट्रो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मेट्रो प्रशासनाने परतीच्या प्रवासाची अर्थातच रिटर्न तिकिटाची सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच एक मार्च 2024 पासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. मेट्रो प्रशासनाच्या या निर्णयामुळे आता पुणे मेट्रोने आता जाताना आणि येताना वेगळे तिकीट काढावे लागणार आहे.

साहजिकच यामुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाया जाणार आहे. प्रवासादरम्यान वेळ वाचावा म्हणून आणि दोनदा तिकीट काढण्यासाठी काउंटरवर किंवा एटीव्हीएम मशीनवर जाऊन तिकीट काढण्यात वेळ खर्च करण्यापेक्षा बरेच प्रवासी एकदाच परतीचे (रिटर्न) तिकीट काढतात.

पण, मेट्रो प्रशासनाने आता १ मार्चपासून रिटर्न तिकीट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना जाताना-येताना वेगळे तिकीट काढावे लागणार आहे.

यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जाणार असे बोलले जात आहे. म्हणून आता प्रशासनाच्या या निर्णयावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *