Pune-Lonavala Local Train : पुण्यातील लोकल प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, पुणे ते लोणावळा या मार्गावर सध्या स्थितीला लोकल चालवली जात आहे.
विशेष म्हणजे या मार्गावरील लोकलला प्रवाशांकडून विशेष प्रतिसाद देखील मिळत आहे. लोकलमुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास खूपच जलद झाला आहे.
दरम्यान पुणे ते लोणावळा लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उद्या अर्थातच 18 फेब्रुवारी 2024 ला थोडा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. कारण की, पुणे ते लोणावळा दरम्यान चालवल्या जाणाऱ्या काही लोकल गाड्या उद्यासाठी रद्द करण्याचा निर्णय झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्या 18 फेब्रुवारीला पुणे ते लोणावळा या मार्गावर अत्यावश्यक अभियांत्रिकी व देखभालीची कामे करण्यासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या काही लोकल गाड्या रद्द केल्या जाणार आहेत.
अशा परिस्थितीत, या मार्गावरील लोकलच्या प्रवाशांना उद्या मनस्ताप सहन करावा लागला आहे. दरम्यान, आता आपण या मार्गावरील कोणत्या लोकल गाड्या रद्द करण्याचा निर्णय झाला आहे हे थोडक्यात पाहणार आहोत.
कोणत्या लोकल होणार रद्द?
मिळालेल्या माहितीनुसार, उद्या पुण्याहून नऊ वाजून 57 मिनिटांनी सुटणारी, अकरा वाजून 17 मिनिटांनी सुटणारी, 15.00 वाजता सुटणारी, 16:25 वाजताची पुणे-लोणावळा लोकल रद्द केली जाणार आहे.
तसेच उद्या शिवाजीनगर येथून 12 वाजून 5 मिनिटांनी सुटणारी, 17.20 वाजता सुटणारी शिवाजी नगर- लोणावळा लोकल रद्द होणार आहे.
तसेच, शिवाजीनगर येथून 15.47 वाजता सुटणारी शिवाजी नगर- तळेगाव लोकल रद्द राहणार आहे.
लोणावळ्याहून सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी सुटणारी, सकाळी 11:30 वाजता सुटणारी, 17:03 वाजता सुटणारी, 18.08 वाजता सुटणारी, लोणावळा- शिवाजीनगर लोकल रद्द केले जाणार आहे.
लोणावळ्याहून 14 : 50 वाजता सुटणारी, 19:00 वाजता सुटणारी लोणावळा-पुणे लोकल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिवाय, तळेगाव-पुणे-लोकल तळेगावहून 16.40 वाजताची लोकल रद्द केली जाणार आहे.