Pune Local News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ही बातमी पुण्यातील लोकल संदर्भात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकात आज महत्त्वाचा बदल झालेला आहे.
त्यामुळे जर तुम्ही आज विकेंड निमित्ताने पुणे ते लोणावळा या लोकलने प्रवास करण्याच्या तयारीत असाल तर तुम्हाला घराबाहेर पडण्याआधी लोकलच्या बदललेल्या वेळापत्रकाची माहिती घ्यावी लागणार आहे.
खरे तर आज रविवार असल्याकारणाने पुणे ते लोणावळा दरम्यानच्या विभागात इंजीनियरिंग आणि दुरुस्तीच्या कामासाठी तांत्रिक ब्लॉक घेण्याचा निर्णय झाला आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने हा निर्णय घेतला असून यामुळे पुणे ते लोणावळा दरम्यान प्रवास करणाऱ्यांना थोडासा गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.
या तांत्रिक ब्लॉगच्या पार्श्वभूमीवर आज पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या चार लोकल गाड्या रद्द करण्याचा निर्णय झालेला आहे. तसेच एक लोकल ट्रेन अंशतः रद्द झालेली आहे.
साहजिकच यामुळे या मार्गावरील प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आता आपण मध्य रेल्वेने पुणे ते लोणावळा दरम्यानच्या कोणत्या लोकल गाड्या रद्द केल्या आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
कोणत्या लोकल गाड्या रद्द राहणार
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आज अर्थातच 21 एप्रिल 2024 रोजी पुण्याहून लोणावळासाठी सकाळी 11.17 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01564 रद्द राहणार आहे.
आज या तांत्रिक ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर पुण्याहून लोणावळासाठी दुपारी 3.00 वाजता सुटणारी लोकल गाडी क्रमांक 01566 रद्द राहणार आहे.
आज मध्य रेल्वेने घेतलेल्या या ब्लॉकमुळे लोणावळ्याहून पुणेसाठी दुपारी 2.50 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01561 रद्द राहणार आहे.
शिवाय, आज लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता सायंकाळी 5.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01565 रद्द राहणार आहे.
ही लोकल अंशता रद्द राहील
मिळालेल्या माहितीनुसार, या मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगरवरून सायंकाळी 7.10 वाजता सुटणारी शिवाजीनगर – लोणावळा लोकल गाडी क्रमांक 01574 ही ट्रेन शिवाजीनगरऐवजी आज पुणे येथून सायंकाळी 7.00 वाजता सुटणार आहे.