Pune Local News : पुणे शहरातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील पुणे ते लोणावळा या मार्गावर बंद झालेली दुपारची लोकल सेवा पुन्हा एकदा सुरू होणार आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, जगावर कोरोना नामक भयंकर आजाराचे सावट आल्यानंतर संपूर्ण जगात जे आधी कधी घडलं नव्हतं ते घडलं. रेल्वे गाड्या देखील या कालावधीत बंद करण्यात आल्या होत्या. अनेक मार्गांवरील रेल्वे गाड्या आपत्कालीन कामाव्यतिरिक्त ठप्प झाल्या होत्या.
कोरोना काळात पुणे ते लोणावळा दरम्यान धावणारी लोकल गाडी देखील बंद करण्यात आली होती. ज्यावेळी कोरोनाचे सावट पूर्णपणे गेले त्यावेळी पुन्हा एकदा पुणे ते लोणावळा या मार्गावर लोकल सुरू करण्यात आली.
परंतु मार्गावर दुपारच्या वेळेला धावणारी लोकल कोरोना निघून गेल्यानंतरही रुळावर येऊ शकली नाही. त्यामुळे या मार्गावरील दुपारच्या वेळेला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसत होता.
दुपारी कामावरून घराकडे जाणाऱ्या प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना दुपारची लोकल नसल्याने वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. याच पार्श्वभूमीवर दुपारची लोकल सेवा सुरू झाली पाहिजे अशी मागणी पुणेकरांच्या माध्यमातून लावून धरण्यात आली होती.
या मागणीसाठी प्रवाशांनी अनेक वेळा रेल्वे प्रशासनाला निवेदने देखील दिलीत. मात्र निवेदने देऊनही प्रशासन टाळ्यावर येत नव्हते. त्यामुळे संतप्त नागरिकांनी शुक्रवारी डेक्कन क्विनला रुळावरचं अडवले होते. दरम्यान पुणेकरांचा हा एल्गार आता कामी आला आहे.
कारण की, रेल्वे प्रशासनाने दुपारच्या टप्प्यात बंद असलेली पुणे ते लोणावळा लोकल सेवा पुन्हा एकदा प्रवाशांसाठी सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. अशा परिस्थितीत आता आपण या लोकल सेवेचे वेळापत्रक अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस असेल वेळापत्रक ?
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर रेल्वे स्थानकावरून एक फेरी आणि लोणावळा रेल्वे स्थानकावरून एक फेरी अशा दोन फेऱ्या दुपारच्या टप्प्यात सुरू होणार आहेत.
शिवाजीनगर रेल्वे स्थानकावरून दुपारी १२ वाजून पाच मिनिटांनी लोकल सुटणार आणि ही लोकल पाऊण वाचता लोणावळा रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
तसेच लोणवाळा येथून सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी लोकल शिवाजीनगरच्या दिशेने रवाना होणार आहे आणि शिवाजीनगर येथे एक वाजून २० मिनिटांनी पोहचणार असल्याची माहिती समोर आली आहे.