Pune Local New Timetable : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यातील लोकलच्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर येत आहे. जर तुम्हीही लोकलने प्रवास करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
खरे तर पुणे लोकलच्या वेळापत्रकात पुन्हा एक मोठा बदल झाला आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, शिवाजीनगर ते लोणावळा दरम्यान दुपारी देखील लोकल सुरू करण्यात आली आहे.
रेल्वे प्रवाशांच्या आंदोलनानंतर रेल्वे बोर्डाने या मार्गावर दुपारी लोकल सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 31 जानेवारी 2024 पासून या मार्गावर दुपारी देखील लोकल धावू लागली आहे.
31 जानेवारीला देशाचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या मार्गावरील दुपारच्या लोकल सेवेला सुरुवात करण्यात आली आहे.
यामुळे या मार्गावर दुपारच्या वेळी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. परिणामी संबंधित लोकल प्रवाशांच्या माध्यमातून रेल्वेने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे दुपारी सुरू करण्यात आलेल्या लोकाला सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळू लागला आहे. अशातच मात्र लोकलच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता दुपारच्या वेळेत धावणाऱ्या लोकल रविवार वगळता इतर सहा दिवस सुरू राहणार आहेत. अर्थातच रविवारी दुपारी लोकल धावणार नाही.
दुपारच्या लोकल सेवेचे वेळापत्रक
शिवाजीनगर येथून दुपारी १२.०५ वाजता लोकल सुटते आणि लोणावळ्याला दुपारी १.२० वाजता पोहोचते. तसेच लोणावळा येथून सकाळी साडेअकरा वाजता लोकल सुटते आणि १२.४५ वाजता शिवाजीनगर येथे पोहचते.
म्हणजेच शिवाजीनगर-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळी दोन लोकल गाड्या सुरू आहेत. एक गाडी अपमार्गावर आणि एक गाडी डाऊन मार्गावर धावत आहे.
या गाडीमुळे प्रवाशांचा प्रवास निश्चितच सुलभ झाला आहे यात शंकाच नाही. आता मात्र दुपारच्या कालावधीत धावणाऱ्या या दोन लोकल गाड्या रविवारी धावणार नाहीत याची नोंद प्रवाशांनी घ्यायची आहे.