Pune Kolhapur Railway : सध्या उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर लालपरी, एसटी बस, ट्रॅव्हल्समध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. खाजगी वाहनांची संख्या देखील उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाढली आहे. अनेक जण उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आपल्या मूळ गावी परतत आहेत.
तसेच काही जण पर्यटनासाठी बाहेर निघत आहेत. यामुळे विविध रेल्वे मार्गावरील गाड्या हाउसफुल धावत आहेत. हेच कारण आहे की, रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर होणारी अतिरिक्त गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
असाच एक निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. मध्य रेल्वेने कोल्हापूर ते गोंदिया दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचे नुकतेच जाहीर केले आहे. यामुळे कोल्हापूर वरून विदर्भाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ही गाडी मराठवाड्यातून धावणार असल्याने कोल्हापूरहून मराठवाडा आणि पुढे विदर्भाला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना या गाडीचा मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
विशेष बाब अशी की या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला पुणे रेल्वे स्थानकावर देखील थांबा मंजूर करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतलेला आहे.
यामुळे पुण्यातून कोल्हापूरकडे तथा पुण्यातून मराठवाडा आणि विदर्भाकडे जाणाऱ्या प्रवाशांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे. दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक?
मध्य रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर ते गोंदिया विशेष एक्सप्रेस ट्रेन राज्याची सांस्कृतिक राजधानी पुण्याला देखील थांबा घेणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही एकेरी विशेष एक्सप्रेस गाडी 22 एप्रिल पासून धावणार आहे.
ही गाडी कोल्हापूर येथून सकाळी चार वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा पाच वाजता गोंदियाला पोहोचणार आहे. या गाडीला पुण्याला देखील थांबा राहणार आहे.