Pune Jobs : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. एकीकडे सध्या संपूर्ण देशभरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राजकीय पक्ष आणि राजकीय नेते निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. तर दुसरीकडे दहावी पास तरुणांसाठी एक मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत काही रिक्त पदांसाठी पदभरती आयोजित करण्यात आली आहे. या पद भरती प्रक्रिया अंतर्गत महानगरपालिकेतील विविध रिक्त पदांच्या जागा भरल्या जाणार असून याची अधिसूचना देखील महानगरपालिकेने नुकतीच निर्गमित केली आहे.

तसेच या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. त्यामुळे जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल आणि यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर अर्ज सादर करावा लागणार आहे.

दरम्यान, आता आपण या पदभरतीची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

कोणत्या पदासाठी निघाली भरती

अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत, अग्निशामक किंवा फायरमन या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

किती जागा भरल्या जाणार

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत निघालेल्या या पदभरती अंतर्गत या पदाच्या रिक्त असलेल्या 150 जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. तसेच अग्निशमन प्रशिक्षण किंवा इतर संबंधित अभ्यासक्रमाचे किमान 6 महिन्यांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. PCMC च्या या भरतीमध्ये उमेदवारांची शारीरिक चाचणी देखील घेतली जाणार आहे.

अशा परिस्थितीत उंची, छाती आणि वजन इत्यादींच्या तपशीलवार माहितीसाठी उमेदवारांनी नुकत्याच प्रकाशित झालेल्या या भरतीची अधिसूचना वाचणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.

आवश्यक वयोमर्यादा

ह्या पदासाठी किमान 18 ते कमाल 38 या वयोगटातील उमेदवार पात्र राहणार अशी माहिती अधिसूचनेतून समोर आली आहे. विशेष बाब अशी की या पदभरतीत रिझर्व कॅटेगिरी मधील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे.

अर्ज कुठे करायचा आहे ?

या पदभरतीसाठी इच्छुक तथा पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. https://www.pcmcindia.gov.in/jobspcmc.php या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, या पद भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना 17 मे 2024 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

जाहिरात कुठ पाहणार ?

https://drive.google.com/file/d/1UsPL3eQD_UsG8M9fwcGFBS6mV1ujhoZX/view?usp=drivesd या लिंक वर जाऊन या भरतीची सविस्तर जाहिरात पाहता येणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *