Pune House Rent : पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. या शहराला अलीकडे आयटी हब म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहे. याचं कारण म्हणजे पुणे शहरात अलीकडे विविध आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे. आयटी कंपन्यांमुळे या शहराची आयटी हब अशी ओळख होऊ लागली आहे.
पुणे शहर आता आयटी क्षेत्रात हैदराबाद आणि बेंगलोरला टक्कर देऊ लागले आहे. मात्र पुणे शहरात प्रॉपर्टीच्या किमती देखील आता दिवसेंदिवस वधारू लागल्या आहेत.
पुणे शहरात घराच्या किमती सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्यांना आपले घराचे स्वप्न पूर्ण करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे शहरातील अनेक भागांमध्ये घराचे भाडे देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
विशेषता ज्या भागात आयटी कंपन्या आहेत तिथे घराचे भाडे अधिक वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आज आपण पुण्यातील कोणत्या भागात सर्वाधिक घर भाडे आकारले जात आहेत याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पुण्यात सर्वाधिक घरभाडे कोणत्या भागात ?
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हिंजवडी आणि वाघोली या भागात सर्वाधिक घर भाडे आहे. हिंजवडीत २ बीएचके (१ हजार चौरस फूट) सदनिकेचे भाडे यंदा मार्च अखेरीस २६ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या तिमाहीत घरभाडे ४ टक्क्यांनी वाढले आहे. वाघोलीबाबत बोलायचं झालं तर येथे यंदा मार्च अखेरीस टू बीएचके घरांसाठीचे भाडे २२ हजार रुपये प्रति महिना पर्यंत पोहोचले आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत पहिल्या तिमाहीत घरभाडे ७ टक्क्यांनी वाढले आहे. म्हणजेच हिंजवडीच्या तुलनेत वाघोली मध्ये घर भाडे अधिक वाढले आहे. खरे तर हिंजवडी आणि वाघोली हा पुणे शहरातील सर्वाधिक पॉश परिसर म्हणून ओळखला जातो.
येथे सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. या भागाला रस्त्याची कनेक्टिव्हिटी देखील खूपच चांगली आहे. विशेष म्हणजे आगामी काळात पुणेरी मेट्रोचा देखील लाभ मिळणार आहे.
पुणेरी मेट्रोची हिंजवडी ते शिवाजीनगर यादरम्यान प्रस्तावित असून सध्या या मार्गाचे युद्ध पातळीवर काम सुरू आहे. म्हणजेच हिंजवडीला नजीकच्या भविष्यात मेट्रोची देखील भेट मिळणार आहे.