Pune Government Job : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक अतिशय आनंदाची आणि मोठी खुशखबर समोर आली आहे. जर तुम्ही ही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास ठरणार आहे.
विशेषता ज्यांना पुण्यात जॉब करायचा असेल अशांसाठी ही खास संधी राहणार आहे. कारण की महाराष्ट्र राज्य हॉटेल व्यवस्थापन आणि खानपान तंत्रज्ञान संस्था येथे विविध रिक्त पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे.
यासाठीची अधिसूचना देखील संबंधित संस्थेच्या माध्यमातून नुकतीच निर्गमित करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेनुसार या पदभरतीअंतर्गत उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने होणार आहे.
त्यामुळे नवीन वर्षात पुण्यात नोकरी मिळवण्याचा हा मोठा गोल्डन चान्स उमेदवारांसाठी उपलब्ध झाला आहे. दरम्यान, या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन संबंधितांच्या माध्यमातून केले जात आहे.
अशा परिस्थितीत आता आपण या पदभरतीची सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या आणि किती रिक्त पदांसाठी होणार भरती
मिळालेल्या माहितीनुसार या पदभरती अंतर्गत विजिटिंग फॅकल्टी पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तथापि व्हिजिटिंग फॅकल्टी पदाच्या किती रिक्त जागा भरल्या जातील याबाबत स्पष्टोक्ती येऊ शकलेली नाही.
नोकरी कुठे करावी लागणार
निवड झालेल्या उमेदवारांना पुण्यात नोकरी करावी लागणार आहे.
निवड प्रक्रिया कशी राहणार
या भरतीसाठी कोणतीच लेखी परीक्षा आयोजित करण्यात आलेली नाही. थेट मुलाखत घेऊन उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक अहर्ता
या पदासाठीची शैक्षणिक अहर्ता जाणून घेण्यासाठी संबंधित संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे.
मुलाखत केव्हा होणार
अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार या भरतीसाठी 3 जानेवारी 2024 ला मुलाखत होणार आहे. यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या तारखेला मुलाखतीसाठी निश्चित झालेल्या कार्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे.
मुलाखत कुठे होणार
महाराष्ट्र राज्य हॉटेल व्यवस्थापन आणि खानपान तंत्रज्ञान संस्था, शिवाजी नगर, पुणे येथे मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखत ही 3 जानेवारीला वर दिलेल्या पत्त्यावर सकाळी 10.30 ला आयोजित करण्यात आली आहे.