Pune Dam Storage : पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानाने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. तापमानात दिवसेंदिवस मोठी वाढ पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागांमधील तापमान 40°c च्या पार गेले आहे.
मध्यँतरी राज्यातील काही भागांमध्ये तापमान 43° c पर्यंत नमूद केले जात होते. या वाढत्या तापमानामुळे मात्र राज्यातील धरणांमधील पाण्याचा साठा झपाट्याने कमी होत आहे. गेल्या वर्षी मानसून काळात खूपच कमी पाऊस झाला यामुळे आधीच विभागांमधील विहिरी कोरड्या ठाक झाल्या आहेत.
आता राज्यातील धरणांमधील पाण्याचा साठा सुद्धा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. त्यामुळे आगामी काळात पाण्याचे मोठे संकट तयार होणार अशी भीती व्यक्त केली जात आहे. मराठवाड्यात पाण्याची सर्वात बिकट परिस्थिती आहे.
तेथील धरणांमध्ये पाण्याचा साठा हा खूपच कमी झाला आहे. यामुळे आगामी काळात तिथे पिण्याच्या पाण्यासाठी देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यातही तशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
पुणे जिल्ह्यातील अनेक धरणांमधील पाण्याचा साठा हा झपाट्याने कमी होत असून यामुळे पुणेकरांनी आता जपून पाणी वापरले पाहिजे अन्यथा भविष्यात पिण्याच्या पाण्याचे मोठे हाल होतील अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की पुणे विभागातील सर्वच्या सर्व धरणांमध्ये आज 16 एप्रिल रोजी 30.47% एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 38.77% एवढा पाणीसाठा पुणे विभागातील सर्वच्या सर्व धरणांमध्ये शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे पुणे जिल्ह्यातील नागरिकांना आता पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन आता केले जाऊ लागले आहे.
दरम्यान, आता आपण जिल्ह्यातील प्रमुख तरुणांमध्ये सध्या किती पाणीसाठा शिल्लक आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जलसंपदा विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पुणे विभागातील डिंभे धरणात आज 28.70%, चाकसमान 23.39%, भाटघर 11.61%, पवना 34.34%, पानशेत 34.35%, खडकवासला 53.98%, निरा देवघर 37.45% पाणीसाठा शिल्लक आहे.
भाटघर हे पुण्यातील सर्वात मोठे धरण आहे. या धरणात गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये 30.14% एवढा पाणीसाठा शिल्लक होता आता मात्र या धरणात फक्त 11.61 % एवढा पाण्याचा साठा आहे.