Pune-Aurangabad Expressway महाराष्ट्र मध्ये जे काही मोठमोठ्या महामार्गाची कामे सुरू आहेत.त्यामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि औद्योगिक दृष्टिकोनातून वेगाने विकसित होत असलेले छत्रपती संभाजी नगर या राज्यातील महत्त्वाच्या दोन शहरांना जोडणाऱ्या पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस वे खूप महत्त्वपूर्ण असा एक्सप्रेसवे असून या संपूर्ण परिसराच्या विकासासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणारा महामार्ग आहे. पुणे शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्व असलेले छत्रपती संभाजी नगरला जोडण्याचा दृष्टिकोनातून हा दोनशे पंचवीस किलोमीटर अंतराचा महामार्ग उभारला जात आहे. पुणे- छत्रपती संभाजीनगर द्रूतगती महामार्गाचे वैशिष्ट्ये
1- विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा- राज्यातील वाहतूक आणि पायाभूत सुविधा प्रगत व्हाव्यात याकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून जे काही प्रकल्प उभारले जात आहेत त्याचाच एक महत्त्वाचा भाग असून पुणे आणि छत्रपती संभाजी नगर दरम्यानची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हा एक्सप्रेस वे उभारला जात आहे. त्यामुळे निश्चितच या दोन्ही शहरातील वाहतुकीच्या वेळेत बचत होणार आहे.
2- या एक्सप्रेसवेचे स्वरूप- पुणे- छत्रपती संभाजीनगर हा एक्सप्रेस वे 225 किलोमीटर लांबीचा असून तो सहा पदरी असणार आहे. प्रत्येक दिशेने याचे तीन लेन असणारा असून प्रवाशासाठी सुरळीत आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता यावा याकरिता हा महामार्ग उच्च दर्जाचा बनवला जात आहे. तसेच यावर अत्याधुनिक अशा सुविधा असणारा असून यामध्ये सर्विस लेन, आराम करण्यासाठी च्या जागा, पेट्रोल पंप आणि प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक महत्त्वपूर्ण बाबी समाविष्ट असणार आहे.
3- प्रवासाचा वेळ आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी महत्त्वाचा- छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या दोन शहरा दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत या एक्सप्रेस वे मुळे लक्षणीय घट होणार आहे. सध्या या दोन्ही शहरांच्या दरम्यान प्रवास करण्याला जो वेळ लागतो त्यामध्ये या एक्सप्रेस वे मुळे लक्षणेरीत्या घट होणार आहे.
4- टोल प्लाझा- या महामार्गाची देखभाल आणि इतर खर्च भागवण्यासाठी महामार्गावर नियमित अंतराने टोलप्लाझा उभारले जाणार आहेत. यामध्ये प्रवाशांना ते वापरत असलेल्या वाहनांच्या प्रकारानुसार टोल शुल्क द्यावे लागणार आहे व हे जमा होणारे शुल्क या एक्सप्रेस वे च्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी वापरण्यात येणार आहे.
5- आर्थिक व सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा- पुणे ते छत्रपती संभाजी नगर एक्सप्रेस वे मुळे या भागातील आर्थिक व सामाजिक बाबींवर खूप चांगला परिणाम बघायला मिळेल. या दोन्ही महत्त्वपूर्ण शहरातील कनेक्टिव्हिटी सुधारल्यामुळे या ठिकाणचा माल आणि प्रवासी वाहतूक सुलभ होणार असून याच्या आसपासच्या परिसरातील व्यापार आणि पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे. म्हणजेच एकूणच याप्रादेशिक विकासाला यामुळे हातभार लागणार आहे.
या एक्सप्रेसची इतर महत्त्वाची वैशिष्ट्ये
पुणे आणि छत्रपती संभाजी नगर या दोन शहरांना जोडणारा हा प्रस्तावित दृतगती मार्ग पुणे- बेंगलोर महामार्ग आणि पुण्याच्या रिंग रोडच्या जो काही भाग आहे त्या ठिकाणहून सुरु होणार असून छत्रपती संभाजी नगरच्या परिसरामध्ये समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार आहे. जर आपण पुणे ते नागपूर हे 716 किलोमीटर अंतराचा विचार केला तर ते पूर्ण करण्यासाठी 14 ते 16 तास लागतात. परंतु पुणे ते छत्रपती संभाजी नगर एक्सप्रेस वे झाल्यानंतर नागपूर ते पुणे दरम्यान चा प्रवास हा केवळ आठ तासात पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे सांस्कृतिक राजधानी पुणे व राज्याची उपराजधानी नागपूर यांच्या दरम्यानची कनेक्टिव्हिटी देखील सुधारणार आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने हा महामार्ग बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे व त्यामुळे महाराष्ट्रातील पुणे आणि छत्रपती संभाजीनगर दरम्यान प्रवाशांना खूप मोठा फायदा होणार आहे.
या द्रुतगती महामार्गाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा 120 ते 140 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करण्यास सक्षम असणारा असून त्यामुळे वेगवान आणि अधिक कार्यक्षम ड्रायव्हिंगचा अनुभव देखील मिळणार आहे. तसेच या प्रस्तावित महामार्गाचा काही भाग पैठण आणि अहमदनगर जिल्ह्यातून जाणार असून या महामार्गावर विविध शहरे आणि आणि गावांना कनेक्टिव्हिटी मिळणार असल्यामुळे या परिसरामध्ये राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना देखील खूप मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे. महत्वाचे म्हणजे पुणे ते छत्रपती संभाजी नगर या एक्सप्रेसचा विकास हा भारतमाला प्रकल्प फेज दोन चा भाग असून हा प्रकल्प देशातील रस्ते पायाभूत सुविधा वाढण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आखण्यात आलेला आहे. भारतमाला प्रकल्प अंतर्गत देशातील प्रमुख शहरांची कनेक्टिव्हिटी सुधारणे व आर्थिक विकासाला चालना देणे व देशभरातील लोकांना उत्तम वाहतूक सुविधा प्रदान करणे हा आहे. या दृष्टिकोनातून पुणे- छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस वे हा या योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. या एक्सप्रेस वे साठी डीपीआर अंतिम केला जात असून या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जी काही भूसंपादनाची प्रक्रिया आहे ते डिसेंबर 2022 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे.
महामार्गाने जोडली जाणारी शहरे आणि त्यांचे महत्त्व
1- पुणे- पुणे हे शहर महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहरांपैकी एक असून या परिसरातील प्रमुख आर्थिक आणि शैक्षणिक केंद्र असलेल्या पुण्यात एक्सप्रेस वे सुरू होणार असल्यामुळे पुणे जिल्ह्यातील भोर, पुरंदर, हवेली, दौंड आणि शिरूर या तालुक्यांमध्ये हा एक्स्प्रेस वर जाणार असल्यामुळे या भागाचा विकास जलद गतीने होण्यास मदत होणार आहे. तसेच सातकरवाडी, रांजणगाव गणपती, आंबळे, कोरडे, बाबुळसर खुर्द, कारेगाव, दहिवडी आणि गोळेगाव या गावांना देखील फायदा होणार आहे.
2- अहमदनगर- किल्ले आणि मंदिरांसाठी ओळखला जाणाऱ्या ऐतिहासिक शहर अहमदनगर मधून हा एक्सप्रेस वे जाणार आहे. त्यामुळे या जिल्ह्याच्या विकासासाठी देखील खूप मोठा हातभार लागणार आहे.
3- छत्रपती संभाजीनगर- समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक स्थळांसाठी प्रसिद्ध असलेल्या छत्रपती संभाजी नगर शहरात हा एक्सप्रेस वे संपणार आहे. छत्रपती संभाजी नगर शहराचा विचार केला तर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचे दोन ठिकाणी म्हणजेच अजिंठा आणि वेरूळ लेणी या जिल्ह्यात आहेत. तसेच या प्रमुख ठिकाणांव्यतिरिक्त या जिल्ह्यातील विविध शहरे आणि ग्रामीण भागांना या महामार्गामुळे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. दिल्ली ते मुंबई द्रुतगती महामार्गाची पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे एकीकरण केल्यावर पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या प्रवासात लक्षणीय घट होणार आहे. या दोन्ही शहरातील प्रवासाचा वेळ हा चार ते पाच तासाऐवजी केवळ दोन तासांवर येणार आहे.