Pune And Ahmednagar Onion Rate : गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे बाजार भाव दबावत आले आहेत. नोव्हेंबर 2023 पर्यंत कांद्याचे दर तेजीत होते. यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून 2023 च्या सुरुवातीला कमी बाजारभावामुळे कांदा पिकामुळे जे नुकसान झाले होते ते नुकसान आता भरून निघेल अशी आशा व्यक्त केली जात होती.
मात्र डिसेंबर महिन्यात केंद्रातील सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून कांद्याचे बाजार भाव पूर्णपणे गडगडले आहेत. सध्या जो भाव मिळत आहे त्या भावात कांदा विकला तर पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येत नसल्याचे वास्तव आहे.
नुकत्याच चार-पाच दिवसांपूर्वी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका शेतकऱ्याने 24 पोती कांदा विक्री केल्यानंतर त्याला 557 रुपये एवढी रक्कम मिळाली होती. आता या रकमेत पिकासाठी आलेला खर्च कसा भरून निघेल हा मोठा प्रश्न आहे.
सदर शेतकऱ्याने 24 पोती कांदा पिकवण्यासाठी तब्बल 58 हजार रुपयांचा खर्च केला होता. यामुळे हा 58,000 रुपयांचा खर्च सदर शेतकऱ्याला स्वतः फेडावा लागणार आहे. शिवाय त्याने केलेली मेहनत पूर्णपणे वाया गेलेली आहे.
हेच कारण आहे की नाशिक, सोलापूर, पुणे अहमदनगर जिल्ह्यासहित संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात मोठी नाराजी पाहायला मिळत आहेत. खरे तर नुकत्याच चार-पाच दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारने निर्यात बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे.
मात्र निर्यात शुल्क कायम ठेवले असून यामुळे या निर्णयाचा शेतकऱ्यांना अपेक्षित असा फायदा होत नसल्याचे वास्तव आहे. ज्या दिवशी कांदा निर्यात बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला त्या दिवशी बाजारात कांद्याचे भाव वाढलेत.
मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवसापासून कांद्याचे बाजार भावात पुन्हा एकदा घसरण झाली असून आजच्या घडीला पुन्हा एकदा कांदा कवडीमोल दरात विकला जात आहे. दरम्यान आता आपण अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील बाजारांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मंचर लोणी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 1200, कमाल 1900 आणि सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज किमान 300, कमाल सोळाशे आणि सरासरी 1100 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 600, कमाल 2000 आणि सरासरी 1300 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
पुणे पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये किमान 1600, कमाल 1800 आणि सरासरी 1700 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 200, कमाल 2100 आणि सरासरी 1150 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान तीनशे, कमाल 2200 आणि सरासरी 1450 रुपये मिळाला आहे.