Pune Airport New Terminal : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. खरेतर, गेल्या महिन्यात अर्थातच मार्च महिन्यात पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन पूर्ण झाले. दहा मार्चला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या टर्मिनलचे उद्घाटन केले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी या नव्या टर्मिनलचे उद्घाटन पूर्ण केले.
मात्र उद्घाटन होऊन जवळपास सव्वा महिन्याचा काळ उलटत चालला आहे तरीदेखील नवीन टर्मिनल वाहतुकीसाठी सुरू झालेले नाही. नव्या टर्मिनलवरून अजूनही विमान सेवा सुरू झालेली नसल्याने पुण्यातील हवाई प्रवाशांमध्ये शासन आणि प्रशासनाच्या विरोधात मोठी नाराजी पाहायला मिळत आहे.
उद्घाटन होऊन आता जवळपास सव्वा महिना पूर्ण होत आला आहे तरी देखील नव्या टर्मिनलवरून विमान सेवा सुरू झालेली नसल्याने हवाई प्रवाशांना अजूनही गैरसोयीचा सामना करावा लागतोय.
खरेतर नव्या टर्मिनलचे जेव्हा उद्घाटन झाले तेव्हा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी हे नवीन टर्मिनल तात्काळ हवाई प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले पाहिजे अशा सूचना केल्या होत्या.
मात्र या नव्या टर्मिनलवरून विमान सेवेसाठी आवश्यक असणारी हवाई वाहतूक सुरक्षा विभागाची परवानगी मिळालेली नसल्याने हे नवे टर्मिनल वाहतुकीसाठी वापरता येत नसल्याचे बोलले जात आहे.
उद्घाटन झाल्यानंतर एक एप्रिलपासून हे नवे टर्मिनल वाहतुकीसाठी सुरू होईल असा दावा केला जात होता. मात्र, एक एप्रिलचा मुहूर्त हुकला पुढे 15 एप्रिल पासून हे नवे टर्मिनल हवाई प्रवाशांसाठी सुरू होऊ शकते असा अंदाज बांधला जात होता.
मात्र आता हा अंदाज देखील फेल ठरला असून हवाई प्रवाशांच्या माध्यमातून अखेर हे नवे टर्मिनल वाहतुकीसाठी केव्हा सुरू होणार हा सवाल उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या नव्या टर्मिनलवरील सर्व प्रकारच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.
मात्र भारतीय विमानतळ प्राधिकरणाला हवाई वाहतूक सुरक्षा विभागाची परवानगी मिळालेली नाहीये. याशिवाय विमानतळाच्या सुरक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान तैनात करावे लागणार आहे, पण याबाबतची कारवाई देखील अद्याप पूर्ण झालेली नाही.
यामुळे येत्या काही दिवसात हवाई वाहतूक सुरक्षा विभागाची परवानगी मिळाल्यानंतर आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यास मंजुरी मिळाल्यानंतर नवीन टर्मिनल सुरू होऊ शकते असे म्हटले जात आहे. मात्र विमानतळ प्राधिकरणाने नेमके हे नवीन टर्मिनल केव्हा सुरू होणार याबाबत कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही.