Pune Agriculture News : गेल्या काही वर्षांमध्ये भरड धान्याला अर्थातच तृणधान्य उत्पादनाला मोठी चालना मिळाली आहे. विशेष म्हणजे भरडधान्याचा आहारात देखील आता मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे.
केंद्र शासनाने भरडधान्यात अर्थातच तृणधान्यात असलेले आयुर्वेदिक गुणधर्म जगासमोर मांडण्याचे काम केले आहे. यामुळे भरड धान्याला मोठी मागणी आली आहे. देशांतर्गत देखील भरडधान्याच्या मागणीत वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाने देखील तृणधान्यांमध्ये असणारे आयुर्वेदिक गुणधर्म पाहता वर्ष 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये म्हणून साजरा केले. यानिमित्ताने संपूर्ण जगभरात तृणधान्यांची मागणी वाढली.
आपल्या भारतात देखील या कार्यक्रमामुळे तृणधान्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे शासनाच्या माध्यमातून तृणधान्य उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि तृणधान्याची मागणी वाढावी यासाठी विशेष प्रयत्न देखील केले जात आहेत.
सर्वसामान्यांचे आरोग्य चांगले सदृढ रहावे यासाठी आहारात तृणधान्य अतिशय महत्त्वाची भूमिका निभावत आहे. हेच कारण आहे की राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी मिलेट महोत्सव 2024 आयोजित करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
यानुसार मिलेट महोत्सव 2024 पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या तृणधान्याला योग्य भाव मिळावा यासाठी या महोत्सवाचे आयोजन झाले आहे. दरम्यान या महोत्सवातून पुणेकरांना देखील चांगले तृणधान्ये उपलब्ध होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या 2024 मिलेट महोत्सवात तृणधान्य उत्पादक शेतकरी, प्रक्रिया मध्ये कार्यरत असणारे बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, नव्याने सुरू झालेल्या स्टार्टअप कंपन्या सहभागी होणार आहेत.
या महोत्सवात नागरिकांना ज्वारी भगर राळा बाजरी नाचणी सामा कोद्रा ही तृणधान्ये व यापासून तयार करण्यात आलेले उत्पादने उपलब्ध होणार आहेत.
थेट उत्पादकांकडून ही उत्पादने ग्राहकांना उपलब्ध होणार असल्याने चांगल्या क्वालिटीची तृणधान्याची आणि तृणधान्यापासून तयार झालेल्या उत्पादनाची खरेदी नागरिकांना करता येणार आहे.
हा महोत्सव पुण्यातील स्वारगेट जवळ गणेश कला क्रीडा रंगमंच येथे 17 ते 21 जानेवारी दरम्यान आयोजित राहणार आहे. यामुळे नागरिकांना थेट उत्पादकांकडून तृणधान्ये व तृणधान्य पासून तयार झालेले प्रोडक्स खरेदी करता येणार आहेत.