Property in Pune : प्रत्येकाचे आपले स्वतःचे, हक्काचे एक घर असावे असे स्वप्न असते. सोबतच काही व्यक्ती घरांमध्ये गुंतवणूक करतात. अशा परिस्थितीत, भविष्यात घरात केलेल्या गुंतवणुकीच्या बदल्यात चांगला परतावा मिळावा अशी इच्छा असते. तसेच, प्रत्येकाला योग्य बजेटमध्ये चांगल्या लोकेशनवर घर हवे असते.
दरम्यान आज आपण पुणे शहरात कोणत्या ठिकाणी घर घेतले जाऊ शकते याची माहिती जाणून घेणार आहोत. खरं पाहता गेल्या काही दशकात पुणे शहराचा विकास झपाट्याने झाला आहे. शहरात जगभरातील नामांकित आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवण्यास सुरुवात केली आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाकडूनही वेगवेगळ्या सोयीसुविधा पुणे शहरात पुरवल्या जात आहेत. पुणे शहरातील इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्याचे काम जोमात सुरू आहे. शहरात दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी मेट्रो मार्गाची उभारणी केली जात आहे. मेट्रो व्यतिरिक्त वेगवेगळ्या रस्ते प्रकल्पांची कामे देखील शहरात सुरू आहेत.
यामुळे पुणे शहरातील विकास पाहता आता बहुतांशी लोक पुण्यामध्ये स्थायिक होण्याचे स्वप्न पाहत आहेत. यामुळे बहुतेक लोकांना पुण्यामध्ये चांगल्या डेस्टिनेशन वर घर खरेदी करायचे आहे. अशा परिस्थितीत आज आपण या लोकांसाठी पुणे शहरात घर खरेदी करण्यासाठी कोणते डेस्टिनेशन फायदेशीर राहू शकते याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पुण्यातील या भागात घर खरेदी करा
ज्या लोकांना पुणे शहरात घर खरेदी करायचे असेल ते शहरातील पूर्व भागातील विमान नगर, न्यू कल्याणी नगर, मुंढवा, हडपसर, लोणी काळभोर आणि वाघोली या भागात घर खरेदी करू शकतात. पश्चिम पुण्यातील बावधन, भुगाव, बाणेर, बालेवाडी हिंजवडी, वाकड, रावत, गहुंजे हे परिसर देखील हॉट डेस्टिनेशन राहणार आहेत.
दक्षिण पुण्यातील सिंहगड रोड, एन आय बी एम रोड, उंड्री, पिसोळी, कात्रज हे भाग देखील घर खरेदीसाठी उत्तम राहतील. उत्तर पुण्यातील चहोर्ली, आळंदी, चिखली, मोशी आणि चोवासावाडी हे देखील भाग घर खरेदीसाठी हॉट डेस्टिनेशन राहणार आहेत.
याव्यतिरिक्त जे लोक आरामदायी घरांच्या शोधात आहेत आणि ज्यांचे बजेट अमर्याद आहे ते लोक पुणे शहरातील मध्यवस्तीमध्ये देखील घर खरेदी करू शकतात. कोरेगाव पार्क, कोथरूड, प्रभात रोड, कर्वेनगर, एरंडवणे, सहकार नगर या भागात घर खरेदी करू शकतात.