Post Office Scheme : आपल्यापैकी अनेकजण कमाईचा एक हिस्सा गुंतवतात. गुंतवणुकीला अलीकडे अधिक प्राधान्य दिले जात आहे. पैशांची बचत करणे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच पैशांची गुंतवणूक करणे देखील महत्त्वाचे ठरते.
तुम्हाला देखील तुमच्याकडे असणारा पैसा डबल व्हावा असे वाटतय का ? तर मग आज आम्ही तुमच्यासाठी पोस्टाच्या अशाच एका योजनेची माहिती घेऊन जर झालो आहोत. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे दुप्पट होणार आहेत.
विशेष म्हणजे पोस्टाच्या या योजनेतील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहणार आहे. दरम्यान आता आपण पोस्ट ऑफिसच्या याच योजनेची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
गुंतवणूकदारांचे पैसे होणार दुप्पट !
पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र ही अशी एक योजना आहे ज्यात गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट होणार आहेत. या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यात गुंतवलेल्या पैशांवर चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो.
यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे लवकर दुप्पट होतात. तसेच या योजनेत गुंतवणूक केलेल्या पैशांवर पोस्ट ऑफिस कडून चांगले व्याज देखील दिले जात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार इंडियन पोस्ट या योजनेत गुंतवणूक केलेल्या पैशांसाठी 7.5% या दराने व्याज देत आहे.
ही योजना सुरुवातीला फक्त शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली होती. पण या योजनेची लोकप्रियता पाहता आता ही योजना सर्वांसाठी सुरू झाली आहे. या योजनेतून गुंतवणूकदारांना एकरकमी पैसा गुंतवावा लागतो.
एफडी मध्ये जसा एकरकमी पैसा गुंतवला जातो तसाच पैसा या ठिकाणी देखील गुंतवावा लागतो. मिळालेल्या माहितीनुसार, पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूकदारांचा पैसा 9 वर्ष आणि सात महिन्यांमध्ये दुप्पट होतो.
म्हणजेच या योजनेत 115 महिन्यांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केली तर गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट होतो. यात किमान एक हजार रूपयांची गुंतवणूक करता येते आणि कमाल गुंतवणुकीची कोणतीच मर्यादा नाहीये.
या योजनेत कितीही अकाउंट ओपन केले जाऊ शकतात. या योजनेत, एकल खाते, संयुक्त खाते (3 लोकांपर्यंत), अल्पवयीन आणि 10 वर्षांवरील अल्पवयीन यांच्या वतीने पालक स्वतःच्या नावाने खाते उघडू शकतात.
या स्कीम मध्ये जर तुम्ही 115 महिन्यांच्या कालावधीसाठी पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 115 महिने पूर्ण झाल्यानंतर दहा लाख रुपये मिळणार आहेत.