Post Office Scheme : गेल्या काही वर्षांमध्ये महिला सक्षमीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. महिलांसाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहे. केंद्रातील मोदी सरकारने देखील सत्ता स्थापित केल्यापासून महिलांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. यामध्ये महिला सन्मान प्रमाणपत्र या बचत योजनेचा देखील समावेश होतो.

ही एक सरकारी बचत योजना असून योजना सुरू झाल्यापासून अनेक महिलांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे या योजनेला प्रमोट करण्यासाठी योजना सुरू झाल्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील यामध्ये गुंतवणूक केली आहे. ही योजना फक्त महिलांसाठी सुरु असून यात गुंतवणूक करणाऱ्या महिलांना चांगले व्याज देखील दिले जात आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ही केंद्रातील सरकारची एक महत्त्वाकांशी योजना आहे. सरकारने 2023 च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. तेव्हापासून ही योजना सुरू झाली असून आतापर्यंत अनेक महिलांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे. दरम्यान, ही योजना मार्च २०२५ पर्यंत गुंतवणुकीसाठी खुली राहणार आहे. यानंतर मात्र या योजनेत गुंतवणूक करता येणार नाही.

म्हणजेच महिलांकडे या योजनेत गुंतवणुकीसाठी आणखी एका वर्षाचा काळ आहे. योजनेअंतर्गत, महिला सन्मान बचत प्रमाणपत्रावरील गुंतवणुकीवर आयकर कायदा 80C अंतर्गत कर सूट सुद्धा मिळते. पण योजनेंतर्गत मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागणार आहे.

याचा अर्थ यातून मिळणाऱ्या व्याजावर कर लाभ मिळत नाहीत. व्याज उत्पन्नावर टीडीएस कापला जातो. ही योजना वार्षिक 7.5 टक्के व्याज देते, जे प्रत्येक तिमाहीत खात्यात येते परंतु व्याज आणि संपूर्ण मुद्दल परिपक्वतेवर उपलब्ध होते.

कमाल किती गुंतवणूक करता येते?

या बचत योजनेचा कालावधी दोन वर्षे एवढा असून यामध्ये कमाल दोन लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. म्हणजेच दोन लाख रुपयांपेक्षा जास्तीची गुंतवणूक यामध्ये करता येत नाही. जर एखाद्या महिलेने या योजनेत दोन लाख रुपये गुंतवले तर त्या महिलेला 2 वर्षांनी 7.5% या इंटरेस्ट रेटने दोन लाख 32 हजार रुपये मिळतात.

म्हणजेच दोन वर्षाच्या कालावधीत गुंतवणूकदार महिलेला 32 हजार रुपयांचे व्याज मिळते. महिलांना त्यांच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेचे खाते ओपन करता येऊ शकते.

हे खाते ओपन करण्यासाठी केवायसी कागदपत्रे म्हणजेच आधार आणि पॅन कार्ड द्यावे लागते. तुम्हाला चेकसोबत पे-इन-स्लिप देखील द्यावी लागते. या योजनेसाठी बँकेत देखील खाते ओपन करता येते. म्हणजेच पोस्ट ऑफिस समवेतच बँकेत देखील ही योजना सुरू आहे.

किमान किती गुंतवणूक करावी लागते

MSSC या योजनेत किमान एक हजार रुपयांची गुंतवणूक करता येते. किमान गुंतवणूक रक्कम 1000 रुपये आहे आणि गुंतवणुकीची रक्कम 100 च्या पटीत वाढवता येते. मात्र दोन लाख रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम गुंतवता येणार नाही. म्हणजे किमान एक हजार रुपये आणि कमाल दोन लाख रुपये एवढी रक्कम या योजनेत गुंतवता येते.

जर तुम्ही या योजनेत खाते खोलले असेल आणि तुम्हाला आणखी दुसरे खाते उघडायचे असेल तर यामध्ये तुम्हाला तीन महिन्यांचा गॅप ठेवावा लागणार आहे. ही योजना दोन वर्षांची आहे पण तुम्हाला मध्येच पैशांची जर अडचण भासली तर एक वर्षानंतर 40% पैसे काढता येऊ शकतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *