Post Office Scheme : भारतात गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. बँकेची एफडी योजना, बँकेची आरडी योजना, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजना अशा अनेक योजनेत गुंतवणूक केली जाऊ शकते.
आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच एका योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण पोस्ट ऑफिसच्या RD योजनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जर गुंतवणूकदाराने आरडी योजनेत दररोज दोनशे रुपयांची गुंतवणूक केली तर पाच वर्षांनी गुंतवणूकदाराला किती रिटर्न मिळणार याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
पोस्ट ऑफिस कडून मिळालेल्या माहितीनुसार, पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत पाच वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास पोस्ट ऑफिस कडून 6.7% व्याजदराने रिटर्न दिले जातात. विशेष म्हणजे या योजनेत गुंतवणूक केल्यास त्रिमासिक चक्रवाढ व्याजाचा देखील फायदा मिळतो.
आरडी योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या योजनेत दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवली जाऊ शकते. म्हणजेच या योजनेत एक रकमी पैसा गुंतवावा लागत नाही. या योजनेत किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक केली जाऊ शकते.
तसेच या योजनेत गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा ठरवण्यात आलेली नाही. म्हणजेच गुंतवणूकदाराला त्याला हवी तेवढी रक्कम या योजनेत गुंतवणूक शकतो.
पोस्ट ऑफिसची आरडी योजना पाच वर्षांनी परिपक्व होते. पाच वर्षानंतर म्हणजेच मॅच्युरिटी नंतर गुंतवणूकदाराला अर्ज देऊन ही गुंतवणूक पुढे वाढवता येते.
विशेष म्हणजे वाढवण्यात आलेल्या पाच वर्षांच्या कालावधीत गुंतवणूकदाराने पैसे जमा केले नाहीत तरी देखील व्याज मिळत राहणार आहेत.
जर समजा गुंतवणूकदाराने या योजनेत दिवसाला दोनशे रुपये गुंतवलेत म्हणजेच महिन्याला 6 हजार रुपये गुंतवलेत तर चार लाख 28 हजार 197 रुपयांचा मोठा फंड तयार होतो. यात गुंतवणूकदाराला 68 हजार 197 रुपयाचे व्याज मिळते.
जर समजा पाच वर्षांनी आणखी पाच वर्षांसाठी या गुंतवणुकीला मुदतवाढ दिली आणि पुढील पाच वर्षात पुन्हा मासिक 6000 रुपयाची गुंतवणूक केली तर दहा वर्षांनी गुंतवणूकदाराला दहा लाख 25 हजार 131 रुपये मिळू शकतात. यामध्ये तीन लाख पाच हजार 131 रुपयांचे व्याज राहणार आहे.