Police Patil Bharti 2023 : उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी भरती सूचना देखील जारी करण्यात आली आहे. अर्जदार यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करू शकतो. या पदांसाठी 10वी पास उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2023 आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या
ही भरती पोलीस पाटील पदांसाठी केली जात असून याअंतर्गत एकूण 124 रिक्त पदे भरली जात आहेत.
शैक्षणिक पात्रात
या पदांसाठी अर्जदार हा दहावी (एस. एस. सी) उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
येथे अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 25 पेक्षा कमी नसावे आणि 45 पेक्षा जास्त नसावे.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्या.
अर्ज शुल्क
राष्ट्रीयकृत बँकेचे डिमांड ड्राफ्ट व्दारे (D.D.), खुला प्रवर्ग- 500/- रुपये, आरक्षीत/आर्थीक दुर्बल घटक प्रवर्गासाठी- 300/- रुपये, असे आहे.
नोकरी ठिकाण
ही भरती तुमसर व मोहाडी तालुका (भंडारा जिल्हा) येथे होत आहे.
असा करा अर्ज
-इच्छुक उमेदवार http://sdotumsarpolicepatil.in/ वर जाऊन वरील पदासाठी अर्ज करू शकतो.
-वर दिलेल्या वेबसाईटवरूनच अर्ज सादर करावे.
-अर्जदाराला अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
-अर्जसोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा