Worst Tourist Places to Visit in Summer : उउन्हाळा सुरू होताच लोक उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट पाहू लागतात. अशातच बहुतेक लोक उन्हाळ्याच्या सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी फिरण्याचे नियोजन करतात. तसे, उन्हाळ्याच्या सुट्टीत देशात फिरण्यासाठी अनेक भारी ठिकाणे आहेत. पण उन्हाळ्यात काही ठिकाणे फिरणे तुमच्यासाठी वाईट अनुभव ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया अशी कोणती ठिकाणे आहेत, जि उन्हाळ्यात फिरण्यासाठी अत्यंत वाईट पर्याय आहेत. 

उन्हाळ्यात फिरण्यासाठी  थंड ठिकाणे निवडणे कधीही चांगले. पण सहलीच्या उत्साहात लोक अनेकदा चुकीच्या ठिकाणी जाण्याचा पर्याय निवडतात. अम्हणूनच आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांची नावे सांगणार आहोत, जिथे जाणे टाळून तुम्ही सुट्टी खराब होण्यापासून वाचवू शकता.

आग्रा

आग्रा येथे असलेल्या ताजमहालला भेट देण्याचे अनेकांचे स्वप्न असते. दुसरीकडे, ताजमहालचे सौंदर्य प्रत्येक हंगामात अप्रतिम दिसते. पण उन्हाळ्यात आग्राला जाणे हा तुमच्यासाठी चांगला पर्याय नाही. एप्रिल महिन्यापासून आग्रामध्ये खूप उष्णतेला सुरुवात होते. अशा परिस्थितीत, सूर्य आणि घामाच्या दरम्यान आग्रा फिरणे तुमच्यासाठी कठीण होऊ शकते.

मथुरा-वृंदावन

मथुरा आणि वृंदावन ही राधा-कृष्णाची नगरी देशातील प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये गणली जाते. अशा परिस्थितीत धार्मिक स्थळांना भेट देण्याची आवड असलेले लोक उन्हाळ्याच्या सुट्या घालवण्यासाठी मथुरा-वृंदावनकडे वळतात. त्यामुळे उन्हाळ्यात येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते. पण कडक उन्हामुळे आणि गर्दीमुळे तुमचा प्रवास व्यर्थ ठरू शकतो. म्हणूनच उन्हाळ्यात मथुरा-वृंदावन प्रवास टाळणे चांगले.

जैसलमेर

राजस्थानला भेट देणारे बहुतेक पर्यटक जैसलमेर फिरायला विसरत नाहीत. पण उन्हाळ्यात जैसलमेरची गणना देशातील सर्वात उष्ण ठिकाणांमध्ये केली जाते. अशा परिस्थितीत जैसलमेरच्या किल्ल्यापासून वाळवंटापर्यंतचा प्रवास तुमच्यासाठी शिक्षेपेक्षा कमी नाही. म्हणूनच उन्हाळ्यात जैसलमेरला जाण्याचे नियोजन करणे तुमच्यासाठी एक वाईट पर्याय ठरू शकते.

गोवा

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी लोक गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांकडे वळतात. पण उन्हाळ्यात गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर भरपूर आर्द्रता असते. अशा परिस्थितीत समुद्रकिनाऱ्यावर जास्त वेळ फिरणे तुम्हाला शक्य होत नाही. म्हणूनच उन्हाळ्यात गोव्याला जाणे तुमची सहल खराब करू शकते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *