Picnic Spot Near Mumbai : येत्या काही दिवसात उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे. अनेकजण उन्हाळ्यात पर्यटनासाठी बाहेर पडणार आहेत. रखरखत्या उन्हात कुठेतरी शांत आणि थंड ठिकाणी पर्यटनासाठी पर्यटक बाहेर पडणार आहेत.
जर तुम्हीही फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात पर्यटनाचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. खरे तर अजून उन्हाळ्याला सुरुवात झालेली नाही. मात्र उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.
अनेक ठिकाणी तापमानात मोठा बदल पाहायला मिळत असून राज्यातही अनेक शहरांमधील कमाल आणि किमान तापमान वाढले आहे. मुंबईमध्ये देखील आता उष्ण वातावरण पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत मुंबईकर आता या उष्ण वातावरणाला कंटाळून कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन बनवत असतील.
जर तुमचाही मुंबईजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट देण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे. आज आपण मुंबई जवळील काही प्रमुख अन प्रसिद्ध पिकनिक स्पॉटची माहिती जाणून घेणार आहोत.
पांडवकडा धबधबा : येथील थंड हवामान पर्यटकांना विशेष आकर्षित करते. हे ठिकाण खारघर रेल्वे स्टेशन जवळ आहे. येथे गेल्यानंतर तुम्हाला वंडर्स पार्क, मँगो गार्डन बेलापूर, छान सनराइज पॉइंट, रॉक गार्डन ही नयनरम्य ठिकाणे पाहायला मिळणार आहेत.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तुम्ही येथे जाण्याचा प्लॅन तयार करू शकता. तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल तर हे ठिकाण वन डे ट्रिप साठी देखील फायदेशीर ठरू शकते.
महाकाली लेणी : तुम्हाला प्राचीन वास्तू आणि लेणी पाहण्याचा छंद असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच भेट दिली पाहिजे. येथे बारा महिने पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात देखील येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करतात.
यामुळे जर तुमचाही या चालू महिन्यात किंवा पुढील मार्च महिन्यात फिरण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही या मुंबईनजीक असलेल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळाला एकदा नक्कीच भेट दिली पाहिजे. अंधेरी आणि जोगेश्वरी रेल्वे स्थानकावरून या ठिकाणी पोहोचले जाऊ शकते.
देवकुंड : येथे पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. उन्हाळ्यात देखील येथे हजारो पर्यटक येतात. मुंबई जवळील एक प्रसिद्ध पिकनिक स्पॉट म्हणून ओळखले जाते.
येथील नयनरम्य दृश्य तुमच्या मनाला नक्कीच आनंद देणारे ठरणार आहे. इथे गेल्यावर तुम्हाला भिरा धरण आणि ताम्हिणी घाट हे आकर्षक ठिकाण पाहता येणार आहे.