Picnic Spot Near Mumbai : वीकेंड जवळ येतोय, आता अनेकजण वीकेंड एन्जॉय करण्यासाठी बॅग पॅक करणार आहेत आणि एखाद्या निसर्गरम्य पर्यटन स्थळाला भेट देणार आहेत. जर तुमचीही तुमच्या मित्रांसमवेत किंवा परिवारासमवेत वीकेंडला ट्रिप निघत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची राहणार आहे.
कारण की, आज आपण मुंबईलगत असलेल्या पाच फेमस पर्यटन स्थळांची माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे तर मुंबई जवळ आणि मुंबई शहरात फिरण्यासाठी अनेक स्पॉट आहेत.
मात्र आज आपण काही निवडक ठिकाणांची माहिती पाहणार आहोत. हे ठिकाण खूपच निसर्गरम्य असून येथे ट्रीपला गेलात तर निश्चितच तुमच्या ट्रिपचे पैसे वसूल होणार आहेत.
लोणावळा-खंडाळा : मुंबई आणि पुण्यापासून अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरावर वसलेले हे ठिकाण पर्यटकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे.
जर तुमचाही वीकेंडला जवळच्याच ठिकाणी जाण्याचा प्लॅन असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरू शकते. येथील सुंदर वातावरण आणि निसर्गरम्य, मनमोहक दृश्य तुमची ट्रिप विशेष खास बनवणार आहेत.
अलिबाग : अलिबाग हे कोकणातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. अलिबाग समुद्रकिनाऱ्यासाठी खूपच प्रसिद्ध आहे. शांत समुद्रकिनारा आणि ऐतिहासिक किल्ला ही अलिबागची खरी ओळख आहे. येथे गेल्यावर तुम्हाला निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेता येणार आहे.
कर्जत : मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर वसलेले कर्जत पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठिकाण बनत चालले आहे. येथील तलाव आणि टेकड्या पर्यटकांना भुरळ घालत आहेत. जर तुम्हालाही निसर्गाची सुंदरता पाहिजे असेल तर या ठिकाणाला तुम्ही नक्कीच एक्सप्लोर केले पाहिजे.
महाबळेश्वर : महाबळेश्वर हे भारतातील प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक आहे. महाबळेश्वर हिल स्टेशन पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. येथे पर्यटकांची नेहमीच वर्दळ पाहायला मिळते.
स्ट्रॉबेरीच्या बागा आणि पश्चिम घाटाचे विहंगम दृश्य आपल्या नजरेत जर कैद करायचे असेल तर महाबळेश्वरला एकदा नक्कीच भेट दिली पाहिजे. हे हिल स्टेशन खूपच मनमोहक असून येथे गेलात तर तुमची ट्रीप पैसा वसूल होईल.
नाशिक : वाईन सिटी म्हणून संपूर्ण जगभर ख्याती प्राप्त शहर अर्थातच नाशिक. येथील द्राक्ष बागा पर्यटकांना विशेष आकर्षित करत आहेत. वाईन शौकीन लोक येथे आवर्जून भेट देतात.
हे एक लोकप्रिय टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. नाशिकमधील मिसळ आणि वाईन या दोघांचे कॉम्बिनेशन एन्जॉय करण्यासाठी येथे एकदा नक्कीच भेट दिली पाहिजे.