Picnic Spot In Maharashtra : जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत किंवा फॅमिली सोबत ट्रीप काढण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास ठरणार आहे. कारण की आज आपण राज्यातील काही लोकप्रिय पिकनिक स्पॉटची माहिती जाणून घेणार आहोत. खरे तर महाराष्ट्रात हजारो पिकनिक स्पॉट आहेत.
या राज्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळांवर पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. फक्त राज्यातीलच नाही तर देशातील कानाकोपऱ्यातील पर्यटक आणि विदेशातीलही पर्यटक आपल्या महाराष्ट्राच्या पावन भूमीत पर्यटनासाठी हजेरी लावत असतात. कोंकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील पर्यटन स्थळांना एक्सप्लोर करण्यासाठी लाखो पर्यटक आपल्या राज्यात दरवर्षी येत असतात.
दरम्यान आज आपण राज्यातील सातारा जिल्ह्यातील काही फेमस पर्यटन स्थळांची माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्ही सातारा ट्रिप काढणार असाल तर या पर्यटन स्थळांची तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. जेणेकरून तुमची ट्रिप फुल टू पैसा वसूल होईल.
कास पठार : साताऱ्यातील कास पठार पर्यटकांना भुरळ घालते. येथे दरवर्षी लाखो पर्यटक हजेरी लावतात. जर तुम्हालाही निसर्गाचे सौंदर्य आपल्या नजरेत कैद करायचे असेल तर कास पठाराला एकदा नक्कीच भेट द्या. येथे गेल्यानंतर तुमची ट्रिप 101% फुल टू पैसा वसूल होणार आहे.
या पठारावर तुम्हाला विविध जातींची फुले पाहायला मिळतील. तुम्ही कोणत्याही गार्डनमध्ये गेलात तरीदेखील तुम्हाला कास पठारासारखी फिलिंग येणार नाही. यामुळे निसर्गाचा हा अद्भुत नमुना एकदा नक्कीच एक्सप्लोर केला पाहिजे.
ठोसेघर धबधबा : राज्यात हजारो धबधबे आहेत जे की खूपच लोकप्रिय आहेत. यामध्ये ठोसेघर धबधबा देखील समाविष्ट होतो. या ठिकाणी फक्त धबधबाच पाहण्यासारखा आहे असे नाही तर हे संपूर्ण ठिकाण हिरवाईने नटलेले आहे. येथे तुम्हाला चहू बाजूला हिरवळ पाहायला मिळेल शिवाय वन्यजीवांचे देखील तुम्हाला येथे दर्शन होणार आहे. यामुळे जंगल सफारी सारखा अनुभव तुम्हाला मिळणार आहे.
अजिंक्यतारा : सातारा गेलात आणि इथं नाही गेलात तर मग तुमची ट्रिप अपूर्ण राहू शकते. या किल्ल्याची ओळख साताऱ्याचा किल्ला म्हणून आहे. अजिंक्यतारावरून संपूर्ण सातारा शहर पाहता येते. यामुळे जर तुम्ही ट्रिपसाठी किंवा मग कामानिमित्त साताऱ्याला गेलात तर एकदा अजिंक्यतारा नक्कीच एक्सप्लोर करा.
चार भिंती : चार भिंती हे साताऱ्यातील एक प्रमुख ऐतिहासिक स्थळ आहे. येथे हजारो पर्यटक भेटी देत असतात. जर तुम्हीही कधी साताऱ्याला गेलात तर या ठिकाणी नक्कीच भेट द्या.
संगम माहुली : हे साताऱ्यातील एक प्राचीन मंदिर आहे. जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत किंवा परिवारासमवेत सातारा फिरायला गेलात तर या मंदिराला एकदा नक्कीच व्हिजिट करा. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित करण्यात आलेले आहे.
मराठा स्थापत्य शैलीने तयार झालेले हे मंदिर पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. या मंदिरावर जाऊन दर्शन घेतल्यास तुमची ट्रिप खऱ्या अर्थाने सार्थकी लागू शकते. येथील धार्मिक उत्साहाचे वातावरण तुमचा थकवा दूर करेल आणि तुमची संपूर्ण ट्रीप रंगतदार बनणार अशी आशा आहे.