Business Idea Tips : आजकाल अनेकजण नोकरी न करता व्यवसाय करण्याकडे वळत आहेत.
व्यवसाय करण्यावर सुशिक्षित तरुणांचा अधिक भर असल्याचे दिसत आहे. मात्र अनेकांना कोणता व्यवसाय करायचा हे समजत नाही.
पण तुम्ही घरबसल्या एक छोटासा व्यवसाय सुरु करून लाखो रुपये कमवू शकता. जिऱ्याचा व्यवसाय करून तुम्ही कमी कालावधी मालामाल होऊ शकता. यासाठी तुम्हाला जास्त खर्ज देखील येणार नाही.
तुम्ही जिरे शेती करून कमी दिवसांत श्रीमंत होऊ शकता. जिऱ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने त्याला बाजारात प्रचंड मागणी आहे. त्यामुळे जिरे शेती करून तुम्ही कमी कालावधी चांगली आर्थिक कमाई करू शकता.
जिरे शेती कशी करायची?
तुम्हीही जिरे शेती करून लाखो रुपयांचा नफा कमवायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.
ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत जिरे पेरणी केली जाते आणि 110-115 दिवसांत हे पीक काढणीसाठी पक्व होते.
जिऱ्याच्या झाडाची उंची साधारण 15 ते 50 सेमी पर्यंत वाढते. 30 अंश तापमानात कोरड्या हलकी आणि चिकणमाती जमिनीत जिऱ्याची शेती करणे फायद्याची ठरते. देशातील प्रेत्यक स्वयंपाक घरात जिऱ्याचा वापर केला जातो.
तुम्ही जिरे पेरणी करत असलेल्या शेतीमध्ये तण कमी असावे. जिरे पेरणीआधी शेतीची मशागत करणे आवश्यक आहे. त्यानंतरच जिऱ्याची पेरणी करा. पेरणी करण्यासाठी बाजारात अनेक जातीचे जिरे उपलब्ध आहे.
जिऱ्याच्या RZ 19 आणि 209, RZ 223 आणि GC 1-2-3 या चांगल्या जाती बाजारात पेरणीसाठी उपलब्ध आहेत. देशातील 80 टक्क्यांहून अधिक जिरे गुजरात आणि राजस्थानमध्ये पिकवले जाते.
एकट्या राजस्थानमधून 28 टक्के जिरीचे उत्पादन घेतले जाते. जिऱ्याचे सरासरी उत्पादन 7-8 सेमी बियाणे प्रति हेक्टर आहे. प्रति हेक्टर जिरे शेती करण्यासाठी 30,000 ते 35,000 हजार रुपयांचा खर्च येतो.
तसेच 100 रुपये प्रतिकिलोचा भाव जिऱ्याला मिळतो. हेक्टरी 40,000 ते 45,000 रुपये निव्वळ नफा जिरे शेतीतून मिळतो. 5 एकर शेतीमध्ये तुम्ही जिरे पेरले तर तुम्हाला 2 लाख ते 2.25 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवू शकता.