Pune Real Estate : पूर्वी शेतजमीन असणारे वारजे आज पुणे शहरातील विकसित उपनगरांपैकी एक झाले आहे. मुठा नदीच्या काठावर असणारे हे ठिकाण शहराच्या मध्यभागापासून केवळ १२ किमी अंतरावरील पुण्याच्या पश्चिमेला आहे.
उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे, तसेच वारजे हे कोथरूडच्या जवळ असल्यामुळे महागड्या भागांपैकी एक होऊ लागला आहे.
बारजे १९७० पूर्वी हे एक लहान गाव होते. येथे प्रामुख्याने शेती होती. त्यानंतर पुण्याच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यामुळे वारजे हे उपनगराच्या रूपात विकसित झाले, शेती आणि जंगलाचा बहुतेक भाग अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये रूपांतरित झाला, बहुतेक जमीन गृहनिर्माण संकुलांच्या ताब्यात गेली. येथे मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिले.
राष्ट्रीय महामार्ग ४ हा बारजेमधून जातो. त्यामुळे मुंबई, लोणावळा, सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर या पुण्याशेजारच्या महत्त्वाच्या शहरांमधून दळणवळण करणे सहजशक्य आहे.
आजबाजूला डोंगर असल्यामुळे निसर्गसंपन्न परिसर आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए जवळ असल्यामुळे वाढीला मर्यादा आहेत. त्यामुळे आहे त्या जागांवर येथे उंच प्रकल्प उभे राहू लागले आहेत. येथून पुण्यातील महत्त्वाच्या ठिकाणांना चांगली कनेक्टिव्हिटी आहे.
कोथरूड, कात्रज, बाणेर, चांदणी चौक, बावधन, पाषाण, हिंजवडी, डेक्कन येथे सहज जाता येते. पुण्यातील महत्वाचे असलेले आयटी पार्क हिंजवडीशी कनेक्टिव्हिटी सोपी असल्यामुळे येथे आयटीमध्ये नोकरी करणारे अनेक नागरिक राहत आहेत.
त्यामुळे काही बांधकाम व्यवसायिकांनी येथे सर्व सुविधांयुक्त प्रिमियम प्रकल्प साकारले आहेत. रिडेवलपमेंटलाली येथे मोठा वाव असल्यामुळे बांधकाम क्षेत्राचे लक्ष याकडे गेले आहे.
येथे आर्यन्स वर्ल्ड स्कूल, सिंहगड स्कूल, सह्याद्री नॅशनल स्कूल, बॉम्बे केंब्रिज स्कूल आणि मॉडर्न स्कूल अशा शैक्षणिक संस्था आहेत. तसेच एमआयटी, सूर्यदत्ता या प्रमुख शैक्षणिक संस्था जवळच आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठही ४० मिनिटांच्या अंतरावर आहे. तसेच माई मंगेशकर हॉस्पिटल, चैतन्य हॉस्पिटल, आनंद हॉस्पिटलही जवळच आहे. मॉल्स, पेट्रोल पम्प, भाजी मार्केट हाकेच्या अंतरावर आहेत.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली असून, वारजे माळवाडी बस डेपो जवळच असल्याने शहराच्या बहुतेक भागात जाणाऱ्या बसेस इथून सुरू होतात. पुणे स्टेशन, हडपसर, निगडी, हिंजवडी, कात्रज, स्वारगेट, डेक्कन, शिवाजीनगर, मनपा या बसेस सतत ये-जा करत असतात.