Old House Purchasing : प्रत्येकाचे आपले स्वतःचे हक्काचे घर असावे जिथे आपल्या परिवारासमवेत आनंदी आयुष्य घालवता येईल असे स्वप्न असते. यासाठी आपल्यापैकी अनेकजण झगडत आहेत. काही लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे तर काही लोक नजीकच्या भविष्यात घर खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
यामुळे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. याशिवाय अनेकांना मनपसंद जागेवर घर मिळत नाहीये. अशा परिस्थितीत मग अनेक जण जुने घर खरेदी करतात. जुने घर खरेदी करणे देखील फायदेशीर आहे.
यामुळे मनपसंद जागेवर घर मिळते तसेच घर तयार करताना विशेष लक्ष द्यावे लागत नाही, रेडी घर मिळते. त्यामुळे लगेचच शिफ्टिंग करता येते. हेच कारण आहे की जुने घर खरेदी करणे देखील फायदेशीर असल्याचे म्हटले जात आहे. पण जुने घर खरेदी करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे.
दरम्यान आज आपण जुने घर खरेदी करताना कोणत्या गोष्टी तपासून पाहिल्या पाहिजेत याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात जुने घर खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवी.
जुने घर खरेदी करताना कोणत्या गोष्टी तपासून पाहिल्या पाहिजेत
जुने घर खरेदी करताना, ते घर बांधताना कोणकोणत्या साहित्याचा वापर झाला आहे, चांगले मटेरियल वापरले गेले आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे.
घराला दगडी पाया आहे की नाही, ते काँक्रेट फिटिंग, बीम कॉलम याने बांधले गेले आहे की नाही हे तपासले पाहिजे. बीम आणि कॉलम कोणत्या आकाराचे आहेत हे तपासा. तसेच घराला कुठे डागडुजी तर नाही ना हे देखील पाहिले पाहिजे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जे जुने घर खरेदी करत आहात ते घर किती जुने आहे, त्याचे आयुष्य किती आहे याची तपासणी करा.
जुने घर ज्या जागेवर आहे, तो एरिया तुमच्यासाठी सूटेबल आहे की नाही? हे तपासा. तसेच त्या एरियामध्ये जागेची किंमत किती आहे, घरांची किंमत किती आहे याची देखील माहिती मिळवा.
याशिवाय आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या घराचे कागदपत्र. जुन्या घराची सर्व कागदपत्रे तुम्हाला काळजीपूर्वक पाहिली पाहिजेत. तसेच त्या घरावर एखादे कर्ज तर नाही ना ते पण तपासून पाहिले पाहिजे.
तुम्ही जे जुने घर परचेस करणार आहात ते घर एखाद्या सिविल इंजिनियरला दाखवा आणि त्या घराची किंमत योग्य आहे की नाही याची माहिती तज्ञांकडून जाणून घ्या.
जुने घर खरेदी करताना ते घर पुन्हा विकले तर तुम्हाला तोटा तर होणार नाही ना, तुमच्या गुंतवणुकीतून तुम्हाला योग्य परतावा मिळणार ना यादेखील बाबीची योग्य पद्धतीने तपासणी करणे आवश्यक आहे.