Ola New Electric Scooter : आपल्या देशात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची रेलचल अधिक पाहायला मिळत आहे. रस्त्यांवर आता सहजतेने इलेक्ट्रिक वाहन पाहायला मिळत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
खरे तर गेल्या काही वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. शिवाय प्रदूषणाचा स्तर देखील दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत आता बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढू लागली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांना शासनाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. हेच कारण आहे की, आता रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढलेली पाहायला मिळत आहे.
विशेषता रस्त्यांवर इलेक्ट्रिक स्कूटर मोठ्या प्रमाणात नजरेस पडत आहेत. दरम्यान जर तुम्हीही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे ओला या प्रमुख इलेक्ट्रिक स्कूटर निर्मात्या कंपनीने एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च केली आहे. ओला इलेक्ट्रिकने अलीकडेच S1 X 4 kWh इलेक्ट्रिक स्कूटर व्हेरियंट लॉन्च केले आहे.
दरम्यान, आता आपण या नव्याने लॉन्च झालेल्या इलेक्ट्रिक स्कूटरचे फीचर्स आणि किमती विषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे आहेत फिचर्स
ओला इलेक्ट्रिक कंपनीने नव्याने लॉन्च केलेल्या Ola S1 X 4 kWh मध्ये S1 X 3 kWh प्रमाणेच मेकॅनिकल फीचर्स देण्यात आले आहेत. ही गाडी केवळ 3.3 सेकंदात 0-40 किमी प्रतितास वेग पकडते.
या गाडीचा टॉप स्पीड 90 किमी/तास एवढा आहे. इलेक्ट्रिक मोटर 6kW आणि 8bhp उत्पादन करत राहते. यात इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन राइडिंग मोड देण्यात आले आहेत.
केव्हा सुरु होणार डिलिव्हरी
या इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी एप्रिल 2024 पासून सुरु होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार S1 X 3 kWh, S1 X 2 kWh आणि S1 X 4 kWh हे तीनही व्हेरिएंट एप्रिल 2024 मध्ये लॉन्च केले जाणार आहेत.
किती किंमत राहणार?
मिळालेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.10 लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. हे S1 X 3 kWh व्हेरियंटपेक्षा सुमारे 20,000 रुपये महाग आहे. एंट्री लेव्हल Ola S1 X 2 kWh ट्रिमची किंमत 79,999 रुपये एक्स-शोरूम एवढी ठेवण्यात आली आहे.