Ola Electric Scooter Price Hike : Ola सध्या भारतीय बाजारपेठेतील सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक आहे. अशातच तुम्ही देखील इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात ती खरेदी करा, कारण पुढील महिन्यापासून त्यांची किंमत थेट 35,000 रुपयांपर्यंत वाढणार आहे.
सध्या, कंपनी तिच्या सर्व इलेक्ट्रिक स्कूटरवर सुमारे 60,000 ची सबसिडी देत आहे. त्यामुळे आता ही इलेक्ट्रिक स्कूटर सामान्य किंमतीत खरेदी करता येणार आहे. पण पुढच्या महिन्यात ती महाग होणार आहे, अचानक इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीमध्ये का वाढ होत आहे? यामागचे कारण काय आहे? चला जाणून घेऊया.
तुम्हा सर्वांना माहीत असेलच की काही दिवसांपूर्वी अवजड उद्योग मंत्रालय एक नवीन प्रस्ताव आणण्याच्या विचारात होते. अशा स्थितीत हा प्रस्ताव पुढील महिन्याच्या १ जूनपासून हा लागू केला जाऊ शकतो, या प्रस्तावानुसार अनुदानाची किंमत 15,000 प्रति किलोवॅटवरून 10,000 किलोवॅटवर होणार आहे.
या कारणास्तव, इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमत वाढणार असल्याचे बोलले जात आहे. हा प्रस्ताव लागू झाल्यास तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीत लक्षणीय वाढ पाहू शकता, या प्रस्तावानुसार तुम्हाला यापूर्वी सर्व इलेक्ट्रिक वाहनांवर उपलब्ध असलेले 40% प्रोत्साहन केवळ 15% करण्यात येणार आहे.
हा प्रस्ताव संपूर्ण भारतात लागू होताच, भारतभरातील सर्व दुचाकी ज्या इलेक्ट्रिकवर चालणार आहेत, त्यांच्या किंमती वाढणार आहेत. पण असे केल्यास हे चुकीचे पाऊल सिद्ध होऊ शकते. कारण, सध्या लोकांचा कल जास्त इलेक्ट्रिक वाहनाकंडे आहे, अशात जर इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती वाढल्या तर इलेक्ट्रिक वाहनांची विक्री कमी होत जाईल. आणि त्याचा इलेक्ट्रिक मार्केटवर परिणाम होईल.
भारतातील इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार नेहमीच काही ना काही नवीन योजना आणत असते. अशा परिस्थितीत हा प्रस्ताव आणणे चुकीचे पाऊल ठरू शकते.
हा प्रस्ताव मांडल्यानंतर ओलाच्या बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. कारण त्यांच्या किमती डायरेक्ट 35,000 रुपयांपर्यंत वाढतील. या गाड्यांची किंमत आधीच जास्त आहे. अशातच त्यांच्या किंमती आणखीच वाढणार आहेत.