New Expressway : केंद्रातील मोदी सरकारने 2014 मध्ये सत्ता स्थापित केली. तेव्हापासून सरकारने वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. मात्र मोदी सरकारच्या काळात सर्वात जास्त काम झाले असेल तर ते क्षेत्र आहे वाहतुकीच. मोदी सरकारने देशातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.

देशात रस्ते वाहतूक सुधारण्यासाठी मोठमोठ्या महामार्गाची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. अनेक महत्वाच्या महामार्गाची कामे पूर्ण सुद्धा झाली आहेत. आपल्या राज्यातही विविध महामार्गाची कामे सुरू आहेत.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. अशातच आता देशाला एका नवीन एक्स्प्रेस वे ची भेट मिळणार आहे. विशेष म्हणजे हा नवीन एक्सप्रेस वे देशातील चार राज्यांमधून जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शासन वाराणसी-रांची-कोलकाता एक्स्प्रेस वे तयार करणार आहे. हा महामार्ग नुकत्याच काही महिन्यांपूर्वी प्रस्तावित करण्यात आला आहे. हा मार्ग एकूण 7 पॅकेजमध्ये तयार होणार असून यासाठी जवळपास 28 हजार 500 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

या महामार्गाची एकूण लांबी 610 किलोमीटर एवढी राहणार आहे. यामुळे काशी विश्वनाथाच्या नगरीत जाणे सोयीचे होणार आहे. यामुळे पश्चिम बंगालमधील कोलकत्ता ते वाराणसी दरम्यानचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक गतिमान आणि सुरक्षित होणार आहे.

हा एक्सप्रेस वे 4 राज्यांमधून जाणार आहे आणि यापैकी बहुतांशी भाग हा बिहार राज्यात असेल. यामुळे बिहारचा एकात्मिक विकास या निमित्ताने सुनिश्चित होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. तसेच हा महामार्ग ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे राहणार आहे.

कोणत्या चार राज्यांमधून जाणार मार्ग ?

वाराणसी-रांची-कोलकाता एक्सप्रेस वे देशातील चार प्रमुख राज्यांमधून जाणार आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या चार राज्यांना हा मार्ग थेट जोडणारा आहे. त्यामुळे राज्या-राज्यांमधील कनेक्टिव्हिटी आधीच्या तुलनेत आणखी मजबूत होणार आहे.

यामुळे बिहार झारखंड आणि पश्चिम बंगालमधील भाविकांना बाबा विश्वनाथाचे दर्शन सहजतेने घेता येणार आहे. यामुळे भाविकांचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे.

कसा असेल रूट

हा 610 किलोमीटर लांबीचा महामार्ग सहा पदरी राहणार आहे. चार राज्यांमधून जाणाऱ्या या महामार्गाची सुरुवात उत्तर प्रदेश मधील वाराणसी येथून होईल. वाराणसी जिल्ह्यात या महामार्गाची सुरुवात होईल आणि येथील चंदौली येथील बारहुली गावातून बिहारमध्ये प्रवेश करणार आहे. हा जवळपास 28 हजार 500 कोटी रुपये खर्चाचा महामार्ग कैमूर, रोहतास, औरंगाबाद आणि गया या जिल्ह्यांमधून झारखंडमध्ये जाणार आहे.

तसेच झारखंड मधील चतरा, हजीराबाग, रामगड, पीटरबार आणि बोकारो मार्गे पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करणार आहे. तसेच बंगालमधील पुरुलिया, बांकुरा आणि आरामबागमधून जाणारा एक्सप्रेस वे उलुबेरिया येथे राष्ट्रीय महामार्ग 19 वर संपणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *