Renault Duster 2025 : देशातील ऑटो मार्केटमध्ये अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या नवनवीन कार सादर केल्या जात आहेत.
अशातच आता Renault कार उत्पादक कंपनी देखील त्यांच्या नवीन कार मोठ्या बदलांसह पुन्हा एकदा लॉन्च करणार आहे.
Renault कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या आगामी नवीन जनरेशन Duster एसयूव्ही कारवर काम सुरु केल्याचे सांगण्यात येत आहे.
Renault ने त्यांच्या Duster एसयूव्ही कारचे उत्पादन भारतात अलीकडेच बंद केले आहे.
आता नवीन Duster एसयूव्ही कार भारतात देखील लवकरच लाँच केली जाणार आहे. नवीन जनरेशन Duster एसयूव्ही कारमध्ये कंपनीकडून अनेक मोठे बदल केले जाणार आहेत.
कारच्या डिझाईन, इंजिन आणि फीचर्समध्ये हे बदल पाहायला मिळतील. नवीन जनरेशन Duster एसयूव्ही कारमध्ये हायब्रीड इंजिन पर्याय दिला जाण्याची शक्यता आहे.
नवीन जनरेशन Duster बाह्य डिझाईन
नवीन जनरेशन Duster एसयूव्ही कारच्या डिझाईनमध्ये सर्वात मोठा बदल पाहायला मिळेल. वाढत्या एसयूव्ही कारची मागणी लक्षात घेता कारचा लूक अतिशय आकर्षक बनवण्यात आला आहे.
नवीन जनरेशन Duster एसयूव्हीमध्ये फेंडर्स, बॉक्सी व्हील आर्च आणि उच्चारित स्किड प्लेट्स स्क्रीम टफनेस,
तर स्लीक Y-आकाराचे एलईडी हेडलाइट्स आणि टेललाइट्स दिले जाणार आहेत. तसेच या नवीन एसयूव्हीला 217 मिमी ग्राउंड क्लीयरन्स देखील मिळणार आहे.
नवीन जनरेशन Duster इंटीरियर
नवीन जनरेशन Duster एसयूव्ही कारच्या केबिनमध्ये प्रिमीयम फीचर्स दिले जाऊ शकतात. कारच्या केबिनमध्ये 10.1-इंच इन्फोमेन्ट सिस्टीम, Y-आकाराचे AC व्हेंट्स, डिजिटल 7-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नवीन डिझाईन केलेले थ्री-स्पोक स्टीयरिंग व्हील दिले जाणार आहे.
नवीन Duster वैशिष्ट्ये
नवीन जनरेशन Duster एसयूव्ही कारमध्ये एसी फ्रंट सीट्स, वायरलेस स्मार्टफोन चार्जिंग आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलसह कम्फर्ट,
सहा एअरबॅग, ESC, हिल स्टार्ट असिस्ट, TPMS, Arkamys 3D साउंड सिस्टम असे फीचर्स दिले जाणार आहेत.
नवीन Duster इंजिन पर्याय
नवीन Duster एसयूव्ही कारमध्ये 1.6-लिटर पेट्रोल हायब्रीड इंजिन 49hp इलेक्ट्रिक मोटर आणि 1.2kWh बॅटरी पॅकसह दिले जाऊ शकते. कारमध्ये देण्यात येणार हायब्रीड इंजिन कारचे मायलेज वाढवण्यास सक्षम असेल.
तसेच कारमध्ये 1.6-लिटर पेट्रोल इंजिन देखील दिले जाईल. नवीन जनरेशन Duster एसयूव्ही कार 2025 च्या उत्तरार्धात भारतात लॉन्च केली जाऊ शकते. नवीन Duster ने जागतिक बाजारपेठेत Dacia नावाने पदार्पण केले आहे.