Mumbai-Solapur Vande Bharat Train : 2023 हे वर्ष पुणेकरांसाठी विशेष खास ठरले आहे. या चालू वर्षात पुणेकरांना वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. मुंबई-सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ही पुण्यामार्गे सुरू आहे.
विशेष म्हणजे या गाडीला रेल्वे प्रवाशांनी भरभरून असा प्रतिसाद दिला आहे. या गाडीमुळे पुणेकरांचा मुंबईकडील आणि सोलापूरकडील प्रवास गतिमान झाला आहे.
या ट्रेनमुळे मुंबई ते पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान याच सीएसएमटी-पुणे-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस बाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे.
या ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी एक अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी हाती आली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा आता वेग वाढणार आहे. आतापर्यंत ही वंदे भारत एक्सप्रेस 100 ते 110 km प्रति तास या वेगाने धावत होती.
आता मात्र ही एक्सप्रेस 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणार आहे. त्यामुळे या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास गतिमान होणार आहे.
फक्त मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचं नव्हे तर मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेससहित अनेक एक्सप्रेस गाड्यांचा वेग वाढणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून मध्य रेल्वने गाड्यांच्या वेग वाढविण्यासाठी रेल्वे मार्गाचे अद्ययावतीकरण करण्याचे काम सुरू केले असून सिग्नल यंत्रणाही सक्षम केली जात आहे.
यामध्ये मल्टी ट्रॅकिंग, ओव्हर हेड इक्विपमेंट रेग्युलेशन, सिग्नलिंग कामे आणि इतर तांत्रिक कामे केली जात आहेत. ही कामे आता बऱ्यापैकी पूर्ण झाली असल्याने मध्य रेल्वे मार्गावरील अनेक एक्सप्रेस गाड्यांचा वेग वाढणार आहे.
मुंबई -साईनगर शिर्डी वंदे भारत, मुंबई -सोलापूर वंदे भारत, नागपूर दुरांतो एक्स्प्रेस, सीएसएमटी – हावडा एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, सिद्धेश्वर एक्स्प्रेस, एलटीटी गोरखपूर एक्स्प्रेस, एलटीटी – बिलासपूर एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस या एक्सप्रेस गाड्यांचा वेग ताशी 130 किलोमीटर पर्यंत जाणार अशी माहिती समोर आली आहे.