Mumbai Pune Railway News : मुंबई आणि पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर येत आहे. ही बातमी मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांसाठी विशेष खास राहणार आहे. खरेतर, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळांवर गर्दी करत असतात.
हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटन स्थळांवरील गर्दी दरवर्षी वाढत असते. मुंबई आणि पुण्यातूनही मोठ्या प्रमाणात पर्यटन देशातील वेगवेगळ्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर भेटी देत असतात. दरम्यान अशाच पर्यटकांसाठी रेल्वे बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांसाठी रेल्वे बोर्डाच्या माध्यमातून चार विशेष अनारक्षित गाड्या चालवल्या जाणार आहेत. खरे तर पश्चिम बंगाल येथील हुबळी हे एक देशातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.
हुबळी येथे देशभरातील पर्यटक हजेरी लावत असतात. मुंबई आणि पुण्यातूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक हुबळीला पोहोचतात. हिवाळ्यात हुबळीला जाणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. दरम्यान याच पर्यटकांसाठी मध्य रेल्वेने मुंबई ते हुबळी दरम्यान चार विशेष अनारक्षित गाड्या चालवण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.
ही गाडी पुण्यामार्गे धावणार आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्याहून हुबळीला जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता आपण या विशेष अनारक्षित गाड्यांचे वेळापत्रक अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे राहणार वेळापत्रक ?
हुबळी येथे हिवाळ्यात पर्यटकांची वाढणारे गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने देशाची आर्थिक राजधानी मुंबई ते थेट हुबळी दरम्यान चार विशेष अनारक्षित गाड्या चालवण्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच मुंबई ते हुबळी दोन आणि हुबळी ते मुंबई दोन अशा चार गाड्या चालवल्या जाणार आहेत.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आज 3 फेब्रुवारी 2024 ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई येथून गाडी क्रमांक ०११७१ ही ट्रेन दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता हुबळी येथे पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासात ही विशेष एक्सप्रेस ट्रेन गाडी क्रमांक ०११७२ 4 फेब्रुवारी 2024 ला हुबळी येथून रात्री ९.३० वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे पोहोचणार आहे.
तसेच आज 3 फेब्रुवारी 2024, शनिवारी दुपारी दिड वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून गाडी क्रमांक ०११७३ सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ६.२० वाजता हुबळी येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी क्रमांक ०११७४ ही हुबळी येथून रविवारी (दि. ४) रात्री आठ वाजता सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजून ३५ मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे पोहोचणार आहे.
गाडी कुठं थांबणार ?
ही विशेष गाडी या मार्गावरील राज्यातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. सेंट्रल रेल्वेने म्हटल्याप्रमाणे ही विशेष एक्सप्रेस ट्रेन दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, जेजुरी, कुईवाडी, पंढरपूर, सांगोला, मिरज, बेळगाव, लोंडा आणि धारवा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.