Mumbai-Pune Expressway : राजधानी मुंबई ते सांस्कृतिक राजधानी पुणे यादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरेतर या दोन्ही शहरादरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात.
प्रामुख्याने रस्ते मार्गाने प्रवास करणाऱ्यांची संख्या यामध्ये अधिक आहे. दरम्यान, जर तुम्ही आज अर्थातच 13 फेब्रुवारी 2024 ला मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे.
ती म्हणजे हा मार्ग आज काही कालावधीसाठी बंद ठेवला जाणार आहे. हलक्या आणि जड वाहनांच्या वाहतुकीसाठी हा मार्ग आज काही कालावधीसाठी बंद राहणार अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री बसवण्याचे काम केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हे काम पूर्ण केले जाणार आहे.
आज 13 फेब्रुवारी 2024 मंगळवार दुपारी बारा ते दोन या कालावधीत हे काम पूर्ण केले जाईल अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आज हा मार्ग बारा ते दोन दरम्यान बंद राहणार आहे.परंतु दोन्ही दिशेची वाहतूक बंद राहणार नाही.
आज गॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठी या मार्गाच्या मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारची हलकी आणि अवजड वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा मार्ग बंद राहणार असल्याने वाहन चालकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार आहे.
आज या मार्गाने पुण्याहुन मुंबईकडे येणाऱ्या हलक्या वाहनांना मुंबई वाहिनीवर लेन किलोमीटर ५५ वरून वळण घ्यावे लागेल.
मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ या जुना पुणे मुंबई मार्गावरून जाता येईल. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या हलक्या वाहनांना आणि बसला खोपोली एक्झिट ३९ येथून वळण घेता येईल.