Mumbai Pune Expressway : मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई असा प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. शिक्षण, पर्यटन, उद्योग, नोकरीं अशा विविध कारणांसाठी या दोन्ही शहरादरम्यान प्रवास केला जातो. या दोन्ही शहरादरम्यान दैनंदिन प्रवास करणारे बहुतांशी प्रवासी रस्ते मार्गाने जातात.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ने प्रवास करतात. दरम्यान याच एक्सप्रेस वे ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे. जर तुम्हीही आज या महामार्गाने प्रवास करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसवण्याचे काम केले जाणार आहे. हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमअंतर्गत पुणे ते मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर गॅन्ट्री उभारण्याचे काम होणार आहे.
यामुळे मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या वाहनांची आज काही काळासाठी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज अर्थातच 25 एप्रिल 2024 ला दुपारी बारा वाजेपासून ते दोन वाजेच्या दरम्यान मुंबई वाहिनीवर सर्व प्रकारच्या हलक्या तथा जड वाहनांना वाहतुकीस बंदी राहणार आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतला असून प्रवाशांना या निर्णयाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज दुपारी बारा ते दोन या कालावधीत या मार्गाने मुंबई वाहिनीवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इतर पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रुतगती मार्गावरून पुणे ते मुंबई वाहिनीवरील (पुण्याहून मुंबईकडे येणारी) हलकी वाहने मुंबई वाहिनीवर लेन ५५ किमी येथून वळवून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या जुन्या पुणे- मुंबई मार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडूंग टोल नाक्यामार्गे मुंबई वाहिनीवरून मार्गस्थ होणार आहेत.
त्यामुळे जर तुम्ही आज या एक्सप्रेस वे ने प्रवास करण्याच्या तयारीत असाल तर तुम्हाला याची काळजी घ्यावी लागणार आहे. यावेळी प्रशासनाने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.