Mumbai Pune Expressway : वीकेंड आला की पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढते. आपल्या बीजी शेड्युल मधून वेळ काढून अनेक जण वीकेंडला ट्रीप काढतात. परिवारासमवेत किंवा आपल्या मित्रांसमवेत विकेंड एन्जॉय करण्यासाठी बाहेर पडतात.

दरम्यान 23 डिसेंबर अर्थातच शनिवारी, रविवारी आणि सोमवारी म्हणजे कालपर्यंत सलग तीन दिवस सुट्टी आल्या होत्या. यामुळे हे तीन दिवस राज्यातील विविध पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी झाली होती. पुणे आणि मुंबई मधील पर्यटक पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडले होते.

पुण्यातील आणि कोकणातील प्रमुख पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी पाहायला मिळाली. एकाच वेळी हजारो पर्यटक पर्यटनासाठी बाहेर पडल्यामुळे अनेक पर्यटन स्थळांवर पर्यटकांची रेकॉर्डब्रेक गर्दीची नोंद करण्यात आली.

त्याचा परिणाम म्हणून मुंबई-पुणे महामार्गावर देखील मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान याच वाहतूक कोंडीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

शनिवारी आणि रविवारी मुंबई पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्यात. त्यामुळे या वाहतूक कोंडीतून प्रवास करणे प्रवाशांना मोठे कष्टाचे ठरले. या महामार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागली.

बोरघाटात तब्बल दहा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा होत्या. याच वाहतूक कोंडीच्या दरम्यान मुंबई-पुणे महामार्गासह जुन्या महामार्गावर बोर घाटात शेकडो वाहने अचानक बंद पडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडे जाताना शिंग्रोबाच्या आधीच ही वाहने बंद पडलीत.

यामुळे वीकेंड एन्जॉय करण्यासाठी बाहेर निघालेल्या पर्यटकांची काही काळ चांगलीच भांबेरी उडाली होती. अनेकांना वीकेंड एन्जॉय करणे महागात पडले. कारण की, वाहनचालकांना गाड्या बंद पडल्यामुळे अक्षरशः धक्का मारून गाडी चालू करण्याचा प्रयत्न करावा लागला.

ऐनवेळी अनेकांना मेकॅनिकला बोलवावे लागले. यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाया गेला. दरम्यान याच साऱ्यांचा व्हिडिओ आता सोशल मीडियामध्ये वेगाने व्हायरल केला जात आहे.

या व्हिडिओमध्ये मुंबई पुणे महामार्गावर शेकडो वाहने अचानक बंद पडल्याचे पाहायला मिळत आहे. वाहनचालक गाडीचे बोनेट ओपन करून गाडी रिपेरिंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसतय.

मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक कोंडीमुळे जास्तीची हिट निर्माण झाली आणि यामुळे गाडीचे आतील यंत्रणा ओव्हर हीटिंग होत होती आणि हेच कारण होते की वाहनचालकांनी गाडीचा बोनेट ओपन करून ठेवला होता.

एकंदरीत शनिवारी रविवारी आणि सोमवारी लागून आलेल्या सुट्टीमुळे वीकेंडला मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनाची गर्दी पाहायला मिळाली आणि यामुळे सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागला.
https://www.instagram.com/reel/C1PYSx-Ppb7/?igsh=MzRlODBiNWFlZA==

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *