Mumbai Picnic Spot : हिवाळा, उन्हाळा असो किंवा पावसाळा सर्वच ऋतूंमध्ये पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडतात. अनेक जण कोकण सह राजधानी मुंबईला एक्सप्लोर करण्यासाठी येत असतात. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे राज्य राजधानी आहे.

हे शहर जगातील प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये समाविष्ट होते. या शहरात दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक दाखल होत असतात. दरम्यान मुंबई शहरात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी एक अतिशय आनंदाही आणि मोठी बातमी समोर आली आहे.

ही बातमी मुंबईसह संपूर्ण कोकण एक्सप्लोर करणाऱ्या पर्यटकांसाठी खूपच खास राहणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार मुंबईनजीक पर्यटकांसाठी एक नवीन टेन्ट सिटी स्थापित केली जाणार आहे.

यामुळे लवकरच कोकण सह मुंबई मध्ये दाखल होणाऱ्या पर्यटकांना या टेन्टसिटीचा आनंद घेता येणार आहे. ही टेन्ट सिटी रायगडच्या किहीम बीचवर स्थापित होणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार टेन्ट सिटी मार्च किंवा एप्रिल महिन्यात पर्यटकांसाठी खुली होऊ शकते. खरंतर अलीकडे पर्यटक टेन्ट सिटी मध्ये राहण्यास इच्छुक आहेत.

पर्यटनासाठी आलेले पर्यटक टेन्ट सिटीत राहण्यासं इच्छुक असतात. यामुळे एमटीडीसी ने याबाबतचा निर्णय घेतला आहे. अलिबागच्या समुद्र किनाऱ्याला भेट देण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक या ठिकाणी येत असतात.

अशा परिस्थितीत हे पर्यटक रात्रीच्या मुक्कामाला या टेन्ट सिटीमध्ये येतील अशी आशा आहे. मुंबईहून अलिबागला पोहोचण्यासाठी विविध वाहतुकीचे मार्ग उपलब्ध आहेत.

त्यामुळे या ठिकाणी पोहोचणे पर्यटकांना अवघड जाणार नाही. हाती आलेल्या माहितीनुसार या नव्याने तयार होत असलेल्या टेन्ट सिटी मध्ये रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था राहणार आहे.

येथे जेवणाची देखील उत्तम व्यवस्था केली जाणार आहे. सोबतच या ठिकाणी इनडोअर आणि आऊटडोर खेळ देखील विकसित होणार आहे.

विशेष म्हणजे तारकर्ली आणि लोणावळा येथे देखील अशा प्रकारची टेन्ट सिटी तयार करण्याचे नियोजन आहे. काही ठिकाणी खाजगी संस्था याचे काम करणार आहेत तर काही ठिकाणी एमटीडीसी याचे काम करणार आहे. 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *