Mumbai News : मुंबई शहरात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची प्रकल्प पूर्ण झाली आहेत. रस्त्यांच्या आणि रेल्वेच्या नवीन प्रकल्पांमुळे शहरातील दळणवळण व्यवस्था ही मजबूत झाली आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यामुळे आधीच्या तुलनेत अधिक मजबूत झाली आहे.
दरम्यान शहरात अजूनही अनेक रस्ते प्रकल्पांची कामे सुरू आहेत. वांद्रे-वरळी सी लिंक ते मरिन ड्राइव्ह दरम्यानचा सागरी किनारा मार्ग हा देखील असाच एक महत्त्वाचा रस्ते मार्ग प्रकल्प आहे. दरम्यान याच प्रकल्पाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे.
ती म्हणजे या प्रकल्पाचा पहिला टप्पा पुढील महिन्यात सुरू होणार आहे. या सागरी किनारी प्रकल्पाचा मरीन ड्राईव्ह च्या दिशेने जाणारा पहिला टप्पा 9 फेब्रुवारी पर्यंत सुरू करण्याचे टार्गेट मुंबई महापालिकेने ठेवले आहे.
खरे तर या सागरी किनारी मार्गाचे आतापर्यंत 84 टक्के एवढे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, या प्रकल्पाचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर पाऊण तासाचा प्रवास अवघ्या पंधरा मिनिटात पूर्ण होईल अशी आशा आहे.
खरे तर देशात येत्या काही महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत या निवडणुकांपूर्वीच या मार्गाचा पहिला टप्पा सुरू करण्यात यासाठी महापालिकेकडून धडपड केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मरिन ड्राइव्ह ते वांद्रे वरळी सी लिंक असा १०.५८ किमी लांबीचा हा मार्ग आहे. या पैकी मरिन ड्राइव्ह ते प्रियदर्शनी पार्क असा पहिला टप्पा, प्रियदर्शनी पार्क ते लोग्रो नाला दुसरा टप्पा आणि लोग्रो नाला ते वरळी सी लिंक अशा तीन टप्प्यांत सागरी किनारा मार्गाचे काम होत आहे.
दरम्यान यापैकी पहिला टप्पा पुढील महिन्यात सुरू होईल अशी आशा आहे. विशेष म्हणजे हा पहिला टप्पा सकाळी आठ ते रात्री आठ या कालावधीतच सुरू ठेवला जाणार आहे.
तसेच शनिवारी आणि रविवारी हा मार्ग बंद राहणार आहे. जेणेकरून या प्रकल्पाचे राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण करता येईल. पहिला टप्प्यात प्रियदर्शनी ते मरिन ड्राइव्हपर्यंत साडे तीन किलोमीटर लांबीचा बोगदाही सेवेत येणार आहे.
त्यामुळे वरळी सी फेस ते मरिन ड्राइव्ह असा सध्या अर्धा ते पाऊण तासांचा प्रवास १० ते १५ मिनिटांत होणार असा दावा केला जात आहे.
विशेष म्हणजे बोगद्यामधील साडेतीन किलोमीटर चा प्रवास हा फक्त तीन ते साडेतीन मिनिटात पूर्ण होऊ शकणार आहे. एकंदरीत हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर मुंबईमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आधीच्या तुलनेत आणखी मजबूत होणार आहे.