Mumbai News : मुंबईसहित संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत. तसेच काही प्रकल्पांची कामे अजूनही सुरूचं आहेत. मुंबई कोस्टल रोड प्रकल्प हा देखील असाच एक महत्त्वाकांशी प्रकल्प आहे.
हा प्रकल्प उत्तर आणि दक्षिण मुंबईला जोडणारा आहे. दरम्यान, याच प्रकल्पासंदर्भात एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. ते म्हणजे या प्रकल्पाचा पहिला फेज येत्या 19 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरु होणार आहे.
कोस्टल रोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. खरंतर कोस्टल रोड प्रकल्प दोन भागात विभागला गेला आहे. उत्तर आणि दक्षिण अशा दोन भागात या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे.
या प्रकल्पांतर्गत मुंबई ते कांदिवली दरम्यान 29 किलोमीटरचा सागरी किनारा मार्ग तयार होणार आहे. सुरुवातीला मात्र दक्षिण कोस्टल रोड प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे. या दक्षिण कोस्टल रोड प्रकल्पाअंतर्गत 10.58 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा मार्ग विकसित होत आहे.
हा मार्ग मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाओवर पासून सुरू होतो आणि वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंत जातो. दरम्यान मरीन ड्राईव्ह ते वरळी असा 10.58 किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड 19 फेब्रुवारी पासून सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.
याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकल्प मे 2024 पर्यंत सर्वसामान्यांसाठी सुरू होणार असा दावा मीडिया रिपोर्ट्स मध्ये केला जातोय.
या कोस्टल रोड प्रकल्पाचे काम मुंबई महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण केले जात असून महापालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी या प्रकल्पाचे दोन्ही फेज मे 2024 मध्ये सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. या प्रकल्पामुळे मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी नियंत्रणात येईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
दक्षिण कोस्टल रोड प्रकल्पाची वैशिष्ट्ये
या 10.58 किलोमीटर लांबीच्या कोस्टल रोड प्रकल्प अंतर्गत दोन बोगदे तयार होणार आहेत. मरीन ड्राईव्ह पासून ते प्रियदर्शनी पार्क पर्यंत हे बोगदे राहणार आहेत. हे बोगदे अरबी समुद्र आणि मलबार हिलच्या खालून जाणार आहेत.
या बोगद्याची एकूण लांबी चार किलोमीटर एवढी असेल. या कोस्टल रोडवर तीन इंटरचेंज राहणार आहेत. पहिला इंटर चेंज एमर्सन गार्डन, दुसरा इंटर चेंज हाजी अली आणि तिसरा इंटरचेंज वरळी येथे राहणार आहे.
या प्रकल्पासाठी 12 हजार 700 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. हा संपूर्ण मार्ग आठ पदरी राहील परंतु बोगद्यामध्ये सहा लेन राहणार आहेत. म्हणजेच एका बोगद्यामध्ये तीन लेन राहतील.