Mumbai News : मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. हे अपडेट आहे मुंबई कोस्टल रोड संदर्भात. हा प्रकल्प मुंबईकरांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा आहे. या प्रकल्पांतर्गत पहिल्यांदाच मुंबई शहरात समुद्रालगत रस्ता तयार केला जात आहे. हा सागरी किनारा मार्ग दक्षिण मुंबई मधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सक्षम राहणार आहे.

एकंदरीत नॉर्थ मुंबई आणि साउथ मुंबई यांना जोडणारा हा मार्ग राहील. या प्रकल्पामुळे मुंबईच्या वैभवात भर पडणार आहे, शिवाय वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रदूषणाचा स्तर देखील नियंत्रणात राहील असा दावा बीएमसी प्राधिकरणाने केला आहे.

या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी लिंक दरम्यान 10.58 किलोमीटर लांबीचा एक आठ पदरी मार्ग तयार केला जात आहे. दोन्ही दिशेने चार-चार लेन असे एकूण आठ लेन या मार्गांअंतर्गत तयार होत आहेत. खरंतर कोस्टल रोड प्रकल्प अंतर्गत मुंबई ते कांदिवली पर्यंत मार्ग तयार केला जाणार आहे. हा संपूर्ण कोस्टल रोड प्रकल्प 29 किलोमीटरचा राहणार आहे.

पण या प्रकल्पाचे एकूण दोन टप्प्यात विभाजन झाले आहे. उत्तर कोस्टल रोड प्रकल्प आणि दक्षिण कोस्टल रोड प्रकल्प असे विभाजन करण्यात आले आहे. यामध्ये दक्षिण कोस्टल रोड प्रकल्प अंतर्गत मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओवर पासून सुरू होऊन वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंत 10.58 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार केला जात आहे.

मरीन ड्राईव्ह ते वरळी वांद्रे सी लिंकपर्यंत तीन इंटरचेंज आहेत. पहिला इंटर चेंज एमर्सन गार्डन, दुसरा इंटरचेंज हाजी अली आणि तिसरा इंटरचेंज वरळी येथे आहे. संपूर्ण कोस्टल रोड प्रकल्प आठ पदरी असेल मात्र या प्रकल्पअंतर्गत तयार होत असलेल्या बोगद्यांमध्ये सहा लेन राहणार आहेत.

एका बोगद्यात तीन लेन राहतील. भारतातील पहिला-वहिला समुद्र खालील बोगदा याच प्रकल्पात तयार केला जात आहे. गिरगावजळ या बोगद्याला सुरुवात होते. अरबी समुद्र, गिरगाव चौपाटी आणि मलबार हिलच्या खालून हा बोगदा जातो आणि ब्रीच कँडी पार्क इथं हा बोगदा संपतो.

या बोगद्याचा व्यास १२.१९ मीटर आहे. तर त्याची खोली ही समुद्रसपाटीपासून १७-२० मीटर आहे. महत्त्वाचं म्हणजे या बोगद्याचा सुमारे १ किलोमीटरचा भाग समुद्राखाली बांधण्यात येणार आहे. हा बोगदा तयार करण्यासाठी सर्वात मोठ्या टनेल बोरिंग मशीनचा वापर करण्यात आला आहे.

या बोगद्यात एकूण दहा क्रॉस पॅसेज तयार होणार आहेत. त्याचा वापर इमर्जन्सी मध्ये होणार आहे. इमर्जन्सी मध्ये रेस्क्यू ऑपरेशन करताना याचा वापर होणार आहे. या पॅसेजेसची एकूण लांबी 11 ते 15 मीटर एवढी आहे. बोगद्यात प्रत्येकी तीनशे मीटर अंतरावर हे क्रॉस पॅसेज तयार करण्यात आले आहेत. बोगद्यामध्ये प्रत्येक 100 मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत.

संपर्क साधण्यासाठी प्रत्येक 50 मीटर अंतरावर पब्लिक ऍड्रेस स्पीकर आहेत. जर एखाद्या वाहनाला आग लागली तर तेवढे तापमान सहन करण्याची कपॅसिटी बोगदा व भिंतीमध्ये आहे. यातील एका बोगद्याची लांबी 3.45 किलोमीटर एवढी आहे. यामध्ये संपूर्ण हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे.

या प्रकल्पामुळे जवळपास पाऊण तासाचा म्हणजेच 45 मिनिटाचा प्रवास फक्त आणि फक्त दहा मिनिटात पूर्ण होणार आहे. संपूर्ण मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचा पहिला टप्पा अर्थातच एक मार्गीका फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. परंतु संपूर्ण मुंबई कोस्टल रोड प्रकल्प हा मे 2024 मध्ये सुरू होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *