Mumbai Local Railway : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई म्हणजेच तोबा गर्दी. या शहरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करायचा असेल तर लोकल शिवाय दुसरा कोणताच चांगला पर्याय तुम्हाला दिसणार नाही.
हेच कारण आहे की मुंबईच्या लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते. खरे तर लोकलचा प्रवास हा तुलनेने स्वस्त आणि जलद आहे. यामुळे नेहमीच व्यस्त असणाऱ्या या शहरात वेळ वाचवण्यासाठी लोकललाचं विशेष पसंती दाखवली जाते.
मात्र लोकलमध्ये मोठी गर्दी असते. यामुळे सर्वसामान्यांचे मोठे हाल होतात. मात्र आता मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई शहरातील लोकलचा प्रवास लवकरच सुरक्षित आणि जलद होणार आहे. आता राजधानी मुंबईमध्ये लोकलची संख्या वाढणार आहे.
राजधानीत 30 अतिरिक्त लोकल चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नागरिकांचा प्रवास सुलभ होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
निश्चितच रेल्वेचा हा निर्णय शहरातील नागरिकांना मोठा दिलासा देणारा राहणार असून या निर्णयाची आता लवकरच अंमलबजावणी होण्याची शक्यता देखील एका प्रतिष्ठित वृत्त संस्थेच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
कोणत्या मार्गावर चालवली जाणार अतिरिक्त लोकल
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शहरातील गोरेगाव ते बोरिवली दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेचं काम नवीन वर्षात एप्रिल किंवा मे अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे.
हे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर लोकल सुरू होणार आहे. पश्चिम रेल्वेवर यातील अतिरिक्त गाड्या सुरू होणार असल्याने रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
या सहाव्या मार्गीकेमुळे चर्चगेट ते विरार दरम्यान 25 ते 30 अतिरिक्त लोकल रेल्वे गाड्या सुरू होतील अशी आशा आहे. निश्चितच हा निर्णय या संबंधित भागात प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी खूपच दिलासादायी राहणार आहे.
या 30 अतिरिक्त गाड्यांमुळे या भागातील लोकल गाड्यांमधील गर्दी काही अंशी कमी होईल अशी आशा आता व्यक्त केली जात आहे. तथापि या अतिरिक्त गाड्या सुरू होण्यासाठी आणखी चार ते पाच महिन्यांचा काळ बाकी आहे.